राज ठाकरेंचा संजय राऊतांना सल्ला, भेटीत काय काय घडलं?, सुनील राऊतांनी A टू Z सांगितलं!


राज ठाकरेंनी घेतली संजय राऊत यांची भेट मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज (3 नोव्हेंबर) शिवेसना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राज ठाकरेंनी यावेळी संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली. राज ठाकरेंच्या या भेटीनंतर ठाकरे गटाचे आमदार आणि संजय राऊतांची बंधू सुनील राऊत (Sunil Raut) यांनी प्रतिक्रिया दिली. तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे आमच्या घरी आल्याचं सुनील राऊत म्हणाले.

संजय राऊत (Sanjay Raut) यांना काही दिवसांपूर्वी गंभीर आजाराचे निदान झाले होते. संजय राऊत यांनी स्वत: सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली होती. डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. या आजारावर उपचार करण्यासाठी संजय राऊत यांनी काही दिवस सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याचेही सांगितले होते. परंतु, संजय राऊत यांची प्रकृती अपेक्षेपेक्षा लवकर सुधारत असल्याची माहिती समोर आली आहे.

राज ठाकरेंचा संजय राऊतांना सल्ला, भेटीत काय काय घडलं? (Raj Thackeray Meets Sanjay Raut)

संजय राऊत आजारी आहेत. राज ठाकरे सतत माझ्या संपर्कात होते. संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस करत होते. संजय राऊतांना यूएसला नेलं पाहिजे की अन्य काही केले पाहिजे, याबाबत राज ठाकरे माझ्याशी बोलत होते, अशी माहिती सुनील राऊतांनी माध्यमांशी बोलताना दिली. आज राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनंतर आमच्या घरी आहे. आम्ही खूप आनंदी आहोत, असं सुनील राऊत म्हणाले. तसेच राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात जवळपास 25-30 मिनिटं चर्चा झाली. राज ठाकरेंनी यावेळी संजय राऊतांना सल्ला दिला. तुझा ज्याप्रकारचा आजार आहे, त्यानूसार तुला राहावं लागेल. लोकांमध्ये न जाता दीड-दोन महिने आराम करावा, असा सल्ला राज ठाकरेंनी संजय राऊतांना दिल्याची माहिती सुनील राऊतांनी दिली. तसेच मी आधी घरी आलेलो तेव्हा वेगळ्या प्रकारची एन्ट्री होती. त्यावेळी रोड कसा होता, याबाबतही राज ठाकरेंनी चर्चा केल्याचं सुनील राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरेंनीही घेतली संजय राऊतांची भेट (Uddhav Thackeray Meets Sanjay Raut)

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या भांडूप येथील मैत्री बंगल्यावर जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी, संजय राऊतांची प्रकृती सुधारत असल्याचे म्हटले होते. ते लवकरच राजकारणात पुन्हा सक्रिय होतील, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. यानंतर संजय राऊत हे घरात राहूनच सोशल मीडियावरुन राजकीय घडामोडींवर भाष्य करताना दिसून आले होते.

संबंधित बातमी:

Sanjay Raut Meets Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊतांची भेट, आशिष शेलारही उपस्थित; चर्चांना उधाण, नेमकं कारण काय?

आणखी वाचा

Comments are closed.