पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहारातील मोठा मासा; पोलिसांकडून अटक, जमीन विकणारी शीतल तेजवानी कोण?
पार्थ पवार लँड स्कॅम पुणे कोण आहे शीतल तेजवानी पुखसार: पुणे येथील मुंढव्यातील 40 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणी (Land Scam Pune) आरोपी शीतल तेजवानीला (Sheetal Tejwani) पुणे पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणात शीतल तेजवानी मुख्य आरोपी असून तिची चौकशी देखील करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी ही जमीन खरेदी करण्यात आली होती. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य सुत्रधार म्हणून शीतल तेजवानीची याआधी दोन वेळा चौकशी केली होती. चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून शीतल तेजवानीचा जमिनीच्या गैरव्यवहारात थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यावर काल (3 डिसेंबर) अखेर अटकेची कारवाई करण्यात आली. तर आज (4 डिसेंबर) शीतल तेजवानीला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
शीतल तेजवानीला अटक करण्याची कारणे कोणती? (What are the reasons arrest of Sheetal Tejwani?)
शासनाचे कोणतेही आदेश नसताना जमिनीचे मूळ वतनदार आणि वारसदार त्यांच्याकडून कागदपत्र तयार करून जमीन विक्री केल्याप्रकरणी फसवणूक केल्यामुळे अटक
शासनाची जमीन परस्पर विक्री केल्याप्रकरणी शासनाची फसवणूक करण्यात आली.
तेजवानीने स्वतःच्या फायद्यासाठी जमीन विक्री, पोलीस तपासातून निष्पन्न
तेजवानीने मुंढवा येथील जमिनीचा 7/12 बंद असताना सुद्धा व्यवहाराच्या वेळी जोडला
शीतल तेजवानी विरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
याबाबत तेजवानी यांची चौकशी करून त्यांना खुलासा पोलिसांनी मागितला होता.
कोण आहे शीतल तेजवानी?, वादग्रस्त इतिहास काय? (Who Is Sheetal Tejwani)
1.शीतल तेजवानी आणि सागर तेजवानी हे पती-पत्नी आहेत.
2. सागर सुर्यवंशीने शितल तेजवानीसह कुटुंबियांच्या नावे घेतली 10 कर्जे
3. 41 कोटी रुपयांची 10 कर्जे घेताना सागर-शितलने सादर केली बनावट कागदपत्रे
4. सेवा विकास बँकेच्या पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या शाखांतून उचलले कर्ज
5. ज्या कारणांसाठी कर्जे घेतली तिथे ती न वापरता दुसऱ्याच व्यवसायात वापरली
6. 2019 ला सहकार सह आयुक्त राजेश जाधवरांच्या ऑडिटमध्ये शितल-सागरचा घोटाळा उघड
7. सागर सुर्यवंशीने आणि शीतल तेजवानीने घेतलेली कर्जे मुद्दाम फेडली नाही
8. 31 मार्च 2021 पर्यंत कर्जांची रक्कम 60 कोटीच्या घरात
9. जानेवारी 2023 मध्ये ईडीकडून सागर सूर्यवंशीच्या घर आणि कार्यालयावर छापा
10. सागर सूर्यवंशीच्या 45 कोटींच्या मालमत्ता जप्त, मे 2023 मध्ये स्पेशल कोर्टात खटला
11. सागर सुर्यवंशीला ऑक्टोबर 2021मध्ये आधी सीआयडीने आणि नंतर पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक
12. जामिनावर बाहेर येताच सागर सूर्यवंशीला जून 2023मध्ये ईडीकडून अटक
पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरण नेमकं काय? (What Parth Pawar Land Scam Pune)
1. पुण्यातल्या कोरेगाव पार्कमध्ये एकूण 40 एकर जागा
2. 1819 मध्ये जागा महार वतनदारांना दिल्याची सनद
3. 1957 मध्ये सरकारकडून बोटॅनिकल डिपार्टमेंटला जागा
4. 1962 पर्यंत संबंधित जागेवर कोणतंही केंद्र उभारण्यात आलं नव्हतं.
5. 1962 मध्ये फेरफारनंतर जागा भाडेतत्वावर भारतीय वनस्पती सर्वेक्षण केंद्राकडे
6. 40 पैकी 3 एकरमध्ये वनस्पती सर्वेक्षण केंद्र, उर्वरित जागेवर जंगल
7. 2006 मध्ये वतनदारांकडून शीतल तेजवांनींना पॉवर ऑफ अॅटर्नी
8. पॉवर ऑफ अॅटर्नीद्वारे शीतल तेजवानींकडून जागा पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला
संबंधित बातमी:
मोठी बातमी! पुण्याच्या जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अटक; 300 कोटींच्या गैरव्यवहारात कारवाई
आणखी वाचा
Comments are closed.