शाळा बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीनं पुणे हादरलं; शाळेत 390 मुलं, हिंजवडी फेज 1 मध्ये भीतीचं वा
हिंजवडी, पुणे: हिंजवडी फेज 1 मधील एका इंटरनॅशनल नामांकित शाळेला बॉम्बने (Pune School Bomb threat) उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. शाळेच्या ई-मेल वरती धमकीचा मेल आल्यानंतर शाळा प्रशासनाने तात्काळ पिंपरी चिंचवड पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पिंपरी चिंचवड शहर पोलीस घटनास्थळी (Pune School Bomb threat) दाखल झाले, शाळेत तातडीने कसून तपासणी सुरू केली गेली. मेल आला तेव्हा शाळेत 390 मुले होती, त्वरीत शाळा पूर्णपणे मोकळी करण्यात आली. सायबर पोलिसांकडून इमेलची तपासणी सुरू झाली, शाळेत पोलीस दाखल झाले, शाळेत कसून तपास सुरू झाला, यामुळे शाळेतील शिक्षक, लहान मुलं आणि पालक देखील घाबरले.शाळेत सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं, पण यामध्ये बॉम्ब सदृश्य कोणतीही वस्तू आढळली नाही, अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली.मेल पाठवण्याचा खोडसाळपणा कोणी केला? अन् का केला असेल? याचा तपास पिंपरी चिंचवड पोलिसांकडून केला जातोय. (Pune School Bomb threat)
हिंजवडी आयटी पार्कमधील खासगी शाळेला काल (बुधवारी दि. ३) शाळेत बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांसह पोलिसांची चांगलीच धांदल उडाली. तातडीने पोलिस, बॉम्ब शोधक-नाशक पथक आणि श्वानपथकाच्या मदतीने संपूर्ण दोन तास शाळेची तपासणी केली. तपासानंतर हा ई-मेल खोटा असल्याचे निष्पन्न झाले, पोलिसांना कसून तपासणीदरम्यान शाळेमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
Pune School Bomb Threat: मोठ्या स्फोटाची धमकी
हिंजवडी फेज १ येथे ही खासगी शाळा आहे. या शाळेत ३५० विद्यार्थी आहेत. सकाळी शाळेच्या ई-मेलवर एक मेल आला होता. त्यामध्ये शाळेत बॉम्ब ठेवल्याचे सांगितले होते, तर दुपारी शाळेत मोठा स्फोट होणार असल्याचा उल्लेख त्या मेलमध्ये करण्यात आला होता. ई-मेल पाहिल्यानंतर व्यवस्थापनाने तातडीने हिंजवडी पोलिसांना याबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली. शाळेला आलेला ई-मेल कोणत्या ठिकाणीवरून पाठवला गेला, त्यामागील उद्देश, याबाबत तपास करत आहे. प्राथमिक तपासाअंती हा ई-मेल खोटा असला, तरी त्याची सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Pune School Bomb Threat: अचानक पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहून विद्यार्थी, शिक्षक, पालकांही घाबरले
शाळेला या मेलची माहिती मिळाल्यानंतर अचानक पोलिसांचा मोठा फौजफाटा शाळेत दाखल झाला, ते पाहून विद्यार्थी, शिक्षक, पालकांमध्ये भीती पसरली. हिंजवडी पोलिसांनी बॉम्ब शोधक-नाशक पथक आणि श्वानपथकाला पाचारण केले आणि शाळेत धाव घेतली. पोलिसांनी संपूर्ण शाळा रिकामी करण्याचे आदेश दिले.
आणखी वाचा
Comments are closed.