तृतीयपंथीयाला प्रेमप्रकरणात फसवलं, 12 वर्षांच्या संबंधांचा जीवघेणा ‘द एन्ड’; गुरू अन् नातेवाईका


सोलापूर : सोलापुरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करत दुसऱ्याशी लग्न करत असल्याचा आरोप करत पारलिंगी समुदायातील एका व्यक्तीने आत्महत्या (Solapur Crime News) केल्याची घटना समोर आली आहे. सोलापुरातील बाळे येथे राहणाऱ्या पारलिंगी समुदयातील व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी पीडित व्यक्तीने व्हिडिओ (Solapur Crime News) तयार करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पारलिंगी समुदायातील व्यक्तीचे आणि एका तरुणाचे मागील काही वर्षापासून प्रेम संबंध होते. आत्महत्यापूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमध्ये पारलिंगी व्यक्तीने तरुणावर गंभीर आरोप केले आहेत.(Solapur Crime News)

Solapur Crime News: माझ्या समाजाशी माझे संबंध तोडले

‘माझे आणि त्याचे मागील आठ वर्षांपासून संबंध आहेत, त्याने माझ्यासोबत लग्न केलं, मला दुसरीकडे आणून ठेवलं, माझ्या समाजाशी माझे संबंध तोडले, आणि आता तो दुसर लग्न करतोय, त्यामुळे मी आत्महत्या करत असून याला पूर्णपणे तोच जबाबदार आहे’, असंही पारलिंगी समुदायातील व्यक्तीने म्हटलं आहे, दरम्यान या घटनेने सोलापुरात एकच खळबळ उडाली असून सोलापूरच्या शासकीय रुग्णालय परिसरात पारलिंगी समुदायतील व्यक्तींनी मोठी गर्दी केली आहे. आरोपी तरुणावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.(Solapur Crime News)

Solapur Crime News:  घराच्या बाहेर जाऊ दिलं नाही

याबाबत पारलिंगी समुदायातील गुरूंनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या पारलिंगी समुदायातील व्यक्तीचे एका तरूणाशी प्रेमसंबंध होते. त्या दोघांनी एकमेकांशी लग्न केलं. सोबत राहण्यासाठी सांगून आणि इतर गोष्टींनीही फसवूक केली. एक वर्षभर आम्हाला भेटू दिलं नाही. कोणाशीही बोलू दिलं नाही. घराच्या बाहेर जाऊ दिलं नाही. मारहाण देखील केली. तो तरूण दुसरीकडे लग्न करत आहे. माझ्या शिष्याने मरण्यापूर्वी केलेला व्हिडीओ देखील आमच्याकडे आहे. त्या व्हिडीओमध्ये माझ्या शिष्यानं सगळं सांगितलं आहे. फसवणूक केलेल्या तरूणावर तातडीने कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी देखील पारलिंगी समुदायातील गुरूंनी केली आहे.

तर आत्महत्या केलेल्या पारलिंगी व्यक्तीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचं बारा वर्षापासून एकमेकांवर प्रेम होतं. त्या तरूणाने फसवणूक करून पैसे, सोनं सर्वकाही लुटलं. जिथे राहत होता तिथून दुसरीकडे राहण्यासाठी घेऊन गेला, मारहाण करत होता, त्या तरूणाने फसवून नेलं, आणि आता तो दुसरीकडे लग्न करत आहे म्हणून पारलिंगी व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

Solapur Crime News: आत्महत्येपूर्वी व्हिडीओमध्ये काय म्हटलंय?

‘माझे आणि त्याचे मागील आठ वर्षांपासून संबंध आहेत, त्याने माझ्यासोबत लग्न केलं, मला दुसरीकडे आणून ठेवलं, माझ्या समाजाशी माझे संबंध तोडले, आणि आता तो दुसर लग्न करतोय, त्यामुळे मी आत्महत्या करत असून याला पूर्णपणे तोच जबाबदार आहे’

आणखी वाचा

Comments are closed.