बनावट गुटख्याचा कारखाना उद्ध्वस्त, पुणे पोलिसांची कारवाई, 1 कोटींचा मुद्देमाल जप्त
गुन्ह्याच्या बातम्या ठेवा: पुण्यातून (Pune) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात बनावट गुटख्याचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी तब्बल 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुण्यातील लोणी काळभोर परिसरात ही मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक-2 च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बनावट गुटखा तयार करण्याच्या कारखान्यावर छापा टाकला आहे. पुण्यातील थेऊर फाटा येथील कांबळेवस्ती भागातील एका गोदामावर छापा टाकत ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी गोडावूनवर छापा टाकत कारवाई केली
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गोडावूनवर छापा टाकत कारवाई केली आहे. बनावट आर.एम.डी. गुटख्याची सुंगधीत तुंबाखु व विमल गुटखा पान मसाला तसेच गोडाऊनचे बाजुस शेतामध्ये बनावट गुटखा तंबाखु तयार करण्याठी लागणारे कच्चामाल जप्त केला आहे. बनावट सुपारी, सुंगधीत तंबाखु, थंडक, केमिकल, गुलाबपाणी, प्रिन्टेड पाऊच, बॉक्स व पोती असा एकूण एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बनावट गुटखा तयार करणाऱ्या कंपनीचा मालक रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता, कामगार रामप्रसाद ऊर्फ बापु बसंता प्रजापती, अप्पु सुशिल सोनकर, दानिश मुसाकीन खान यांना ताब्यात घेतलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
गुटखा बनवणाऱ्या कारखान्यावरच धाड, 3 कोटींचं साहित्य जप्त; लातुरात 7 जणांविरुद्ध गुन्हा
आणखी वाचा
Comments are closed.