न्यायालयात युक्तिवाद सुरू असतानाच शीतल तेजवानीला चक्कर; पुण्याच्या कोर्टात काय घडलं?


पुणे: पुण्यातील पार्थ पवारांच्या कंपीनीने घेतलेल्या जमीनीच्या प्रकरणात नाव आलेल्या शीतल तेजवानीला (Sheetal Tejwani) आज पुणे पोलिसांनी कोर्टात हजर केलं. यावेळी तेजवानीच्या (Sheetal Tejwani) जामीनाला सरकारी पक्षाच्या वकिलांकडून विरोध करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंढव्यातील त्या जमीनीचे मुळ वतनदार असलेल्या महार वतदनदारांच्या वंशांजाच्या वतीने देखील तेजवानीच्या जामीनाला विरोध करण्यात आला आहे. तेजवानीने (Sheetal Tejwani) आमचीही फसवणूक केल्याचा महार वतनदारांच्या वकिलांचा दावा आहे. कोर्टात सर्व युक्तीवाद सुरू असतानाच शीतल तेजवानीला चक्कर आल्याचा दावा तिने केला. त्यानंतर न्यायाधीशांनी तीला समोरील खुर्चीवर बसण्यास परवानगी दिली‌. दोन्ही बाजुचे वकील युक्तीवाद करत असताना तेजवानी आरोपी म्हणून उभी होती.(Sheetal Tejwani)

Pune Land Scam: शीतल तेजवानीला मराठी समजत नाही

तर तेजवानीच्या वकिलांनी युक्तीवादावेळी म्हटलं की, शीतल तेजवानीला (Sheetal Tejwani) मराठी समजत नाही, तरीही तीला मराठीतुन नोटीस बजावण्यात आली. त्यावर सरकारी वकीलांनी म्हटलं की, शीतल तेजवानीने (Sheetal Tejwani) महार वतनदारांचे कुल मुखत्यारपत्र घेतले होते. जे मराठीमध्ये होते. त्यामुळे तिला मराठा येत नाही या दाव्यात तथ्य नाही.

Pune Land Scam: खोटी कागदपत्रे जोडली…

तर न्यायालयात तपास अधिकाऱ्यांनी म्हटलं की, शीतल तेजवानीने (Sheetal Tejwani) २००६ ते २००८ या कालावधीत कोणतेही अधिकार नसताना मुंढवा भागातील ४० एकर जागेचे महार वतनदारांकडून कुल मुखत्यारपत्र घेतले. सदर जमिन शासनाच्या मालकीची असताना मतेजवानीचे सदर जमीन महार वतनदारांची असल्याचा दावा केला आणि त्यासाठी खोटी कागदपत्रे जोडली होती. २०१३ मधे तेजवानीचा दावा २०१३ मधे तत्कालीन महसुलमंत्र्यांनी फेटाळून लावला होता. त्यानंतर उच्च न्यायालयात तेजवानीने धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने तो दावा फेटाळला होता. तेजवानीने या जमीनीसाठी फक्त अकरा हजार रुपयांचा चेक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला. तो देखील वठलेला नाही. सदर जमीन बाराशे ते पंधराशे कोटी रुपयांची आहे. मात्र अवघे अकरा हजार रुपये भरुन सदर जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला. तेजवानीने अकरा हजार रुपयेच का घेतले, त्यासाठी तीचा उद्देश काय होता यासाठी तेजवानीची चौकशी करायची आहे.

Pune Land Scam: शितल तेजवानीला १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी

तेजवानीने अमेडीया कंपनीच्या दिग्वीजय पाटील यांना ३०० कोटींना सदर जमीन विकण्याचा प्रयत्न केला. ते तीनशे कोटी रुपये कोणत्या अकाउंटला दिले गेले आहेत, याचा तपास करायचा आहे. हा गुन्हेगारी स्वरुपाचा कट आहे. या गुन्ह्याची व्यप्ती मोठी आहे. आणखी आरोपी यामधे सहभागी असण्याची शक्यता आहे. यासाठी शितल तेजवानीला १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी. तहसीलदारांनी कोणतीही खातरजमा न करता सदर जमीन अमेडीया कंपनीला देण्याचे आदेश दिले होते,असंही तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात म्हटलं आहे. तर सदर वादग्रस्त जागा मुळ महार वतनदारांचीच असल्याचा तेजवानीच्या वकिलांनी दावा केला आहे. शीतल तेजवानीला ३०० कोटी मिळालेच नसल्याचा, पैशांचा व्यवहार झालाच नसल्याचा तीच्या वकिलांनी दावा केला आहे. तेजवानीच्या वकीलांनी युक्तीवादावेळी म्हटलं की, तहसीलदार येवलेंनी अमेडीया कंपनीला जमीन सोपविण्यासाठी जीऑलॉजीकल सोसायटीला पत्र दिले. आमचा त्यांच्याशी काही संबंध नाही. येवलेकडे पोलीसांनी चौकशी केलेली नाही. त्याला अटकपुर्व जामीन मिळालाय आणि आमच्यावर कारवाई केली जात आहे. शीतल तेजवानीच्या वकीलांनी तहसीलदार येवलेवर खापर फोडण्याचा प्रयत्न केला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.