Pune Accident News: लोणावळ्यातील लायन्स पॉइंटजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, अंगावर काटा
लोणावळा/ पुणे: गेल्या काही दिवसांमध्ये अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे. पुण्यातील थंड हवेचं पर्यटनस्थळ असणाऱ्या लोणावळ्यात भीषण अपघात (Pune Accident News) झाला आहे. टेम्पो आणि कारची समोरासमोर भीषण धडक झाली आहे. या अपघातात कारच्या समोरच्या भागाचा चक्काचूर (Pune Accident News) झाला आहे. यात दोघे दगावल्याची माहिती बचाव पथकाने दिली आहे. त्यांची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून सुरु आहे. हा अपघात इतका भीषण आहे की कारची आणि टेम्पोची पुढची बाजु पुर्णपणे चक्काचूर झाली आहे. (Pune Accident News)
आणखी वाचा
Comments are closed.