उरणमध्ये जोरदार राडा, मनसे पदाधिकाऱ्याला आईसमोरच मारहाण, भाजप आमदार महेश बालदींची माफी मागायला


भाजपा विरुद्ध मनसे: उरण येथील मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्याला भाजपच्या (BJP) स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. ही मारहाण मनसे कार्यकर्त्याच्या आईसमोरच केल्याचा आरोप असून या प्रकरणामुळे परिसरात राजकीय तणाव निर्माण झाला आहे. मारहाणीनंतर मनसेच्या सतीश पाटील (Satish) यांना जबरदस्तीने भाजप आमदार महेश बालदी (Mahesh Baldi) यांच्या विरोधात बोलल्याबद्दल माफी मागायला लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रकरणाला अधिक गांभीर्य आले आहे.

गुरुवारी रात्री मनसेच्या सतीश पाटील या मनसेच्या पदाधिकाऱ्याला आई समोरचं मारहाण केली असल्याचा आरोप केला जात आहे. उरणचे स्थानिक आमदार महेश बालदी यांच्या संदर्भात आक्षेपार्ह बोलल्यामुळे मनसेच्या सतीश पाटील या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्याचं म्हणणं आहे.

BJP Vs MNS: उरण पोलीस स्थानकात तक्रार दाखल

मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण करून भाजप आमदार महेश बालदी यांची माफी देखील मागायला लावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्याकडून उरण पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात अद्याप भाजप आमदार महेश बालदी यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Shiv Sena UBT vs BJP: ठाकरे गट आणि भाजप कामगार संघटनांमध्ये हाणामारी

दरम्यान, वरळी येथील पंचतारांकित सेंट रेजीस हॉटेलबाहेर शुक्रवारी शिवसेना (ठाकरे) कामगार संघटना आणि भाजप कामगार संघटना यांच्यात जोरदार हाणामारी झाली. हॉटेलमधील कामगारांच्या संघटनेची मान्यता आणि युनियन हडप प्रकरणावरून हा वाद चिघळा. दरम्यान, प्रकरणाची माहिती घेऊन कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सेंट रेजीस सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हॉटेलबाहेर घडलेल्या या घटनेमुळे मुंबईतील कामगार राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सेंट रेजीस हॉटेलमधील कामगारांचे प्रतिनिधित्व कोणत्या संघटनेकडे असावे, यावरून दोन्ही गटांमध्ये तणाव वाढला होता. शिवसेनेचा आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांसाठी लढत आहोत, असा दावा आहे. तर, कामगारांचा मोठा भाग आपल्यासोबत असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. या सर्व घडोमोडींच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी शिवसेनेच्या (ठाकरे) कार्यकर्त्यांनी हॉटेलबाहेर निदर्शने केली. त्यानंतर भाजप कामगार संघटनेचे कार्यकर्तेही तेथे पोहोचले आणि घोषणाबाजी सुरू झाली. काही वेळातच वाद हातघाईवर गेला. पोलिसांनी यात तत्काळ हस्तक्षेप करून दोन्ही बाजूंना शांत केले आणि गर्दी पांगवल्याचे पाहायला मिळाले.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Buldhana Crime News: बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता, टेक्निकल क्लासला जात असल्याचे सांगून घरातून निघाल्या अन्…; बुलढाण्यातील खळबळजनक घटना

आणखी वाचा

Comments are closed.