लोढा म्हणाले देवभाऊ सगळे पक्ष चालवतात, शेट्टी म्हणाले, महाराष्ट्रातील जनता देवाभाऊंना मानत नाही
राजू शेट्टी: देवभाऊ (Devendra Fadnavis) सगळे पक्ष चालवतात असं मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी म्हटलं आहे. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवभाऊ सगळे पक्ष चालवतात पण महाराष्ट्रातील जनता देवा भाऊंना मानत नाही असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला आहे. आज शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जालन्यातील परतूर मधील बागेश्वरी साखर कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सभा पार पडली. या सभेत ते बोलत होते. साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाची पहिली उचल 3 हजार 200 रुपयांची द्यावी अशी मागणी देखील राजू शेट्टी यांनी केली आहे.
ऊसाची पहिली उचल 3 हजार 200 रुपयांची द्यावी
साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाची पहिली उचल 3 हजार 200 रुपयांची द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. आज शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जालन्यातील परतूर मधील बागेश्वरी साखर कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सभा पार पडली. या सभेत ते बोलत होते. बागेश्वरी साखर कारखान्याने शेतकऱ्यांची गेल्या वर्षीची थकीत एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांनी कारखान्याची मालमत्ता जप्त करून लिलावात काढावी अशी मागणी देखील शेट्टी यांनी केली आहे.
राज्यातील उसाचा गळीत हंगाम सुरु होऊन दोन महिन्यांचा कालावधी होऊन गेला आहे. अद्यापही बऱ्याच साखर कारखान्यांनी उसाचा दर जाहीर केलेला नाही. तर काही साखर कारखान्यांनी कमी उसाचा दर जाहीर केला आहे. त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेंसह विविध जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जालन्यातील परतूर मधील बागेश्वरी साखर कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सभा पार पडली. यावेळी उस,ाला पहिली उचल 3200 रुपये मिळावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.
सगळे प्रकल्प गुजरातला नेले आता महाराष्ट्राचा आंबाही चोरायचा विचार आहे का?
हापूस आंब्यावर गुजरातने दावा केला आहे. यावर बोलताना राजू शेट्टी म्हणाले, सगळे प्रकल्प गुजरातला नेले आता महाराष्ट्राचा आंबाही चोरायचा विचार आहे का? हापूस आंब्याचं स्वामित्व कोकणाकडे राहण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाऊ असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
मंत्री लोढा म्हणाले, देवाभाऊंच्याच इशाऱ्याने इतर पक्ष चालतात; शिंदेंचा आमदार भाजपवर संतापला, सांगितला 2022 चा इतिहास
आणखी वाचा
Comments are closed.