पुण्यात अधिकाऱ्याने मागितली 8 कोटींची लाच, दोघे एसीबीच्या सापळ्यात; 30 लाखांचा हफ्ता घेताना रंग


पुणे: पुण्यातील एका सहकारी संस्थेच्या सभासदांकडे आठ कोटीची लाच (bribe) मागून पहिला हप्ता म्हणून तीस लाख रुपये स्वीकारणाऱ्या लिक्विडेटर आणि ऑडिटरला रंगेहात अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या या कारवाईमध्ये सहकार विभागातील लिक्विडेटर विनोद देशमुख आणि ऑडिटर भास्कर पोळ यांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील धनकवडी भागात एकता सहकारी संस्था आहे. या संस्थेच्या मालकीची पुण्यात जागा आहे. २००५ साली स्थापन झालेल्या या संस्थेचे ३२ सभासद आहेत. मात्र २०२० साली सभासदांमध्ये वाद झाल्याने प्रकरण सहकार विभागाकडे गेलं आणि २०२४ साली या संस्थेवर विनोद देशमुख यांची लिक्विडेटर म्हणून नेमणूक करण्यात आली होती. देशमुख यांनी या संस्थेच्या ३२ सभासदांना शेअर सर्टिफिकेट हवं असेल तर तीन कोटी रुपयांची लाच (bribe) मागितली. त्याचबरोबर संस्थेची जागा विक्री करण्यासाठी परवानगी हवी असेल तर आणखी पाच कोटींची मागणी करण्यात आली. त्यापैकी तीस लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना विनोद देशमुख आणि भास्कर पोळ यांना शनिवार पेठेतील एका कार्यालयासमोर रंगे हात अटक करण्यात आली आहे.(Pune Crime News)

Pune Crime News: नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील धनकवडी परिसरामध्ये एकता सहकारी संस्था आहे. या संस्थेच्या मालकीची पुण्यात जागा आहे. २००५ साली स्थापन झालेल्या या संस्थेचे ३२ सभासद आहेत. मात्र २०२० साली सभासदांमध्ये वाद झाल्याने प्रकरण सहकार विभागाकडे गेलं आणि २०२४ साली या संस्थेवर विनोद देशमुख यांची लिक्विडेटर म्हणून नेमणूक करण्यात आली होती. देशमुख यांनी या संस्थेच्या ३२ सभासदांना शेअर सर्टिफिकेट हवं असेल तर तीन कोटी रुपयांची लाच मागितली. त्याचबरोबर संस्थेची जागा विक्री करण्यासाठी परवानगी हवी असेल तर आणखी पाच कोटींची मागणी करण्यात आली. त्यापैकी तीस लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना विनोद देशमुख आणि भास्कर पोळ यांना शनिवार पेठेतील एका कार्यालयासमोर रंगे हात अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदारांनी 5 डिसेंबर 2025 रोजी पुणे एसीबीकडे तक्रार नोंदवली. एसीबीने प्रथम लाचेची पडताळणी केली असता, 8 कोटींची मागणी खरी असल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीअंती 30 लाख रुपये ॲडव्हान्स म्हणून देण्याचे ठरले. एसीबीने शनिवार पेठेतील तक्रारदारांच्या कार्यालयासमोर सापळा रचला आणि देशमुख यांनी पंचांसमोर 30 लाखांची रोख रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने दोन्ही आरोपींना अटक केली. एसीबी अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. पुणे विभागातील सहकारी संस्थांच्या लिक्विडेशन प्रक्रियेत एवढ्या प्रचंड रकमेची लाच मागितल्याची ही पहिलीच घटना मानली जात आहे.

आणखी वाचा

Comments are closed.