मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह 25 खासदाराच्या सह्या
नवी दिल्ली : राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या (Farmers) मदतीबाबत राज्य सरकारची मोठी अनास्था असल्याचे प्रकरण समोर आलं आहे. राज्य सरकारने मदतीसाठी केंद्राला प्रस्तावच पाठवला नसल्याची माहिती पुढे आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अतिवृष्टी अनुदानावरुन खडाजंगी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 2 डिसेंबर रोजी संसदेत लेखी उत्तरात माहिती दिली. सोबतच अतिवृष्टी झालेल्या क्षेत्राची माहिती देण्यातही राज्य सरकारची गंभीर चूक असल्याचे दिसून आले. 14 लाख हेक्टरवर नुकसान झालं असताना केंद्राला मात्र 1.10 लाख हेक्टरचाच आकडा देण्यात आला. त्यावरुन आता खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje nimbalkar) यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. कृषीमंत्र्यांनी सभागृहात खोटी माहिती दिल्याचं ओमराजे यांनी म्हटलंय.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मिळावी, यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्तावच पाठवला नाही. लोकसभेतील खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या तारांकित प्रश्नाला केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच लेखी उत्तर दिलं. राज्यभरात अतिवृष्टीमुळे 75.42 लाख हेक्टर वरील पिकाचे नुकसान, तर 3598 घरांचे नुकसान झालं आहे. महापुराच्या विळख्यात 224 लोकांचा मृत्यू, तर 599 जनावर मृत्युमुखी पडल्याची लेखी उत्तरात माहिती आहे. दरम्यान, केंद्र सरकारनेच स्पष्टपणे याबाबत माहिती दिली आहे. राज्य सरकारने प्रस्ताव वेळेत दिला असता तर तात्काळ मदत मिळण्यास मोठी मदत झाली असती, असे ओमराजे यांनी म्हटलं होतं. मात्र, राज्य सरकारने प्रस्ताव पाठवल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. त्यावरुन, विरोधक आक्रमक झाले होते. त्यामुळे, राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार कृषिमंत्र्यांनी सभागृहात खोटी माहिती दिल्याचा आरोप करत ओमराजे निंबाळकर यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.
हक्कभंग प्रस्तावावर 25 खासदारांच्या सह्या
महाराष्ट्राकडून शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी मागणारा प्रस्ताव आला आहे, असे असत्य विधान केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केल्याचा आरोप करत ओम राजे निंबाळकर यांनी लोकसभा अध्यक्षांकडे हक्क भंग दाखल केला आहे. या हक्कभंगाच्या प्रस्तावावर सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाड, अनिल देसाई, प्रतिभा धानोरकर, बळवंत वानखेडे, कल्याण काळे, संजय दिना पाटील, रवींद्र चव्हाण, अमर काळे, प्रशांत पडोले, शामकुमार बर्वे, बजरंग सोनावणे, निलेश लंके, प्रणिती शिंदे, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, धैर्यशील मोहिते पाटील, शोभा बच्छाव, राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे, अशा एकूण 25 महाविकास आघाडीच्या खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांचं खोटं उघडं पडलं- रोहित पवार
अतिवृष्टीग्रस्तांच्या नुकसानीचा प्रस्ताव राज्याने केंद्राकडे पाठवलाच नसल्याचे केंद्र सरकारने लोकसभेत स्पष्ट केले, त्यावर आम्ही आवाज उठवला असता मुख्यमंत्र्यांनी लोकसभेतील प्रश्नोत्तरे 30-35 दिवस आधीच तयार केले जात असल्याचे सांगत विषय टाळण्याचा प्रयत्न केला होता.परंतु आज सभागृहात उपमुख्यमंत्र्यांनी मदतीच्या नुकसानीचा प्रस्ताव केंद्राकडे 27 नोव्हेंबरला पाठवल्याचे सत्य समोर आणत मुख्यमंत्र्याना त्यादिवशी खोटी ब्रीफिंग झाल्याचे सिद्ध केले, असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.