मुंबईच्या पर्समध्ये पैसे कमी… पण दहशत तितकीचं! अंबानी ‘या’ 5 खेळाडूंना संघात घेण्यासाठी पैसा कर

IPL 2026 लिलाव मुंबई इंडियन्स : मुंबई इंडियन्स (MI) इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 च्या मिनी ऑक्शनमध्ये सर्वात कमी पर्ससह उतरते आहे. केवळ 2.75 कोटींच्या शिल्लक रकमेवर पाच वेळच्या चॅम्पियन संघाला आपली खरेदी करावी लागणार आहे. ऑक्शनपूर्वी MI ने 9 खेळाडूंना रिलीज केले असले तरी त्यांनी आपल्या कोअर टीमला कुठलाही धक्का दिलेला नाही. त्यामुळे अबू धाबीतील ऑक्शनमध्ये संघाकडून हलक्याफुलक्या खरेदीची अपेक्षा आहे.

कोअर टीम कायम, मोठे बदल नाहीत

कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईने गेल्या हंगामातील प्रतिभावान खेळाडू विग्नेश पुथुरला रिलीज केले. डावखुरा वेगवान गोलंदाज असून त्याने केवळ 5 डावांमध्ये 6 विकेट घेत दमदार सुरुवात केली होती. पण मुंबई इंडियन्सची कोअर टीम अजूनही अत्यंत मजबूत आहे. हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा हे प्रमुख भारतीय खेळाडू तर रयान रिकेल्टन, विल जॅक्स, कॉर्बिन बॉश, ट्रेंट बोल्ट आणि मिचेल सॅन्टनर हे प्रभावी विदेशी खेळाडू संघात कायम आहेत. या कारणामुळे MI मोठा दाव लावण्याची शक्यता कमी असून, संघ फक्त आवश्यक त्या जागा भरण्यावर लक्ष देणार आहे.

पर्स कमी, लक्ष्य बजेट-फ्रेंडली खरेदीवर

मुंबईच्या पर्समध्ये मोठी रक्कम नसल्यामुळे फ्रँचायझीची नजर नेहमीप्रमाणे अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर असणार आहे. संघाचा फोकस असेल की, स्वस्तात उपलब्ध भारतीय वेगवान गोलंदाज किंवा स्पिनर आणि उत्तम पर्याय उपलब्ध असेल तर बॅकअप विकेटकीपर. अजून लोअर-ऑर्डरमध्ये एक पावर-हिटर. मुंबईला गेल्या काही हंगामांपासून डेथ ओवर्समध्ये सातत्यपूर्ण गोलंदाजीचा अभाव जाणवत आहे. त्यामुळे या विभागात कामगिरी करू शकणाऱ्या खेळाडूच्या शोधात MI असणार हे निश्चित.

मुंबई इंडियन्स या खेळाडूंवर लावू शकते बोली

डेव्हिड मिलर

एक स्टार खेळाडू मिलरकडे आयपीएलचा बराच अनुभव आहे आणि तो मुंबई इंडियन्सच्या फलंदाजी क्रमात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. किरॉन पोलार्डच्या निवृत्तीपासून, मुंबई इंडियन्स खालच्या क्रमात एक मजबूत फिनिशर शोधत आहे. मिलर हा कोडे सोडवू शकतो. पण, मिलरची बेस प्राईस ₹2 कोटी आहे.

डेव्हिड मिलर

या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने 2023 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी पदार्पणाच्या हंगामात प्रसिद्धी मिळवली, आयपीएल प्लेऑफ इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी केली. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा आकाशला करारबद्ध करू शकते.

केएम आसिफ

उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज चालू सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26 मध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने सहा डावांमध्ये  15 बळी घेतले आहेत. त्याने 42 टी-20 डावांमध्ये 55 झेल देखील घेतले आहेत. त्यामुळे, मुंबई इंडियन्स केरळच्या या गोलंदाजाला टार्गेट करू शकते.

अनमोलप्रीत सिंग

पंजाबचा हा फलंदाज सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26  मध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने सात डावांमध्ये 172.14 च्या स्ट्राईक रेटने 241 धावा केल्या आहेत. त्याची आक्रमक फलंदाजी क्षमता मुंबई इंडियन्सला एक जबरदस्त मधल्या आणि खालच्या फळीतील फलंदाजी प्रदान करू शकते.

मुकुल चौधरी

21 वर्षीय राजस्थानचा विकेटकीपर-फलंदाज मुकुल चौधरी संघाला रायन रिकेल्टन आणि रॉबिन मिंझ यांच्यासोबत विकेटकीपिंगचा पर्याय असेल. त्याने त्याच्या छोट्या कारकिर्दीत 161.03 च्या स्ट्राईक रेटने 124 धावा केल्या आहेत.

मुंबई इंडियन्सने कायम ठेवले खेळाडू : सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, टिळक वर्मा, मयंक मार्कंडे, मिचेल सँटनर, रायन रिकेल्टन, नमन धीर, रघु शर्मा, राज अंगद बावा, रॉबिन मिन्झ, शार्दुल ठाकूर, शेरफेन रदरफोर्ड, ट्रेंट जॅक बॉल्ट, विल. अल्लाह गझनफर, अश्विनी कुमार, कॉर्बिन बॉश, दीपक चहर,

हे ही वाचा –

टीम इंडियाला आणखी एक धक्का; WTC च्या पॉइंट टेबलमध्ये पुन्हा उलथापालथ, टॉप-5 मधून भारत बाहेर, कधी न पोहोचलेल्या स्थानावर घसरण

आणखी वाचा

Comments are closed.