लाडकी बहीण योजनेत 165 कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांनी लाटले; पुरुषांसह शासकीय अधिकारी कर्मचारी

पुणे: राज्यातील लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana) तब्बल १६५ कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांनी लाटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबतची लेखी उत्तरात कबुली दिली आहे. १२ हजार ४३१ पुरुषांनी २५ कोटी रुपये तर ७७ हजार अपात्र महिलांनी १४० कोटी, तर ९५२६ शासकिय महिला कर्मचाऱ्यांनी १४.५० कोटी रुपये लाटल्याचं आदिती तटकरेंनी माहिती देताना सांगितलं आहे. शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडून या पैशांची वसुली करून त्यांच्यावरती रितसर कारवाई केली जाणार असल्याचंही अदिती तटकरे यांनी उत्तर देताना म्हटलं आहे.(Ladki Bahin Yojana)

तर प्रत्येक गावात जिल्हा बँके मार्फत लाडक्या बहिणींना एक लाख रुपयांच बिनव्याजी कर्ज देण्याची मुख्यमंत्री यांची  घोषणा कागदोपत्रीच असल्याचंही समोर आलं आहे. या योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती. मात्र अद्यापही शासन निर्णय जारी  केला नाही. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत लेखी उत्तरात माहिती दिली आहे. (Ladki Bahin Yojana)

Ladki Bahin Yojana: शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडून या पैशांची वसुली करणार

योजना सुरू करण्यात आली तेव्हा सरसकट महिलांनी अर्ज केले होते. सुरूवातील या योजनेसाठी अर्ज करताना आधार क्रमांक, बँक खाते आणि पात्रतेची माहिती तपासण्यासाठी तांत्रिक पडताळणी होती. मात्र काही जिल्ह्यांत डेटा व्हेरिफिकेशनमध्ये गंभीर त्रुटी निर्माण झाल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यामुळे अपात्र महिलांनीही अर्ज करून लाभ घेतला अशी माहिती समोर आली आहे. सिस्टममध्ये झालेल्या चुकांमुळे पुरुषांचे अर्जही मंजूर झाले. लाभार्थ्यांची पात्रता तपासण्यासाठी असलेली तपासणी यंत्रणा तांत्रिक दृष्टीने चुकीची असल्याचे निकष समोर आले आहे. सरकारने हा सर्व प्रकार डिजिटल सिस्टममधील त्रुटी आणि स्थानिक प्रशासनाकडून झालेल्या दुर्लक्षामुळे घडल्याचे नमूद केले आहे. त्यानंतर या योजनेत फक्त पात्र महिलांना लाभ मिळावा यासाठी घालून दिलेल्या अटींची पुढे पुर्तता करत असतानाच यामध्ये शासकिय महिला कर्मचाऱ्यांनी देखील अर्ज केल्याचं समोर आलं आहे. शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडून या पैशांची वसुली करून त्यांच्यावरती रितसर कारवाई केली जाणार असल्याचंही अदिती तटकरे यांनी उत्तर देताना म्हटलं आहे.(Ladki Bahin Yojana)

आणखी वाचा

Comments are closed.