विमानतळावर बॅग चेकिंग; 2 चिप्सचे डबे उघडताच अधिकाऱ्यांनाही बसला धक्का, 72 लाख रुपयांचा…पुण्या
पुणे: पुणे विमानतळावर बॅगा चेक करत असताना एका महिलेकडून तब्बल ७२ लाख रुपयांचा गांजा (Pune Crime News) जप्त करण्यात आला आहे. चिप्सच्या डब्यात (Pune Crime News) या महिलेने ७२२ ग्रॅम गांजा लपवला होता. पुणे विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने याबाबतची कारवाई केली आहे. बँकॉक ते पुणे या विमानाने प्रवास करून आलेल्या महिलेकडे हा गांजा आढळून आला आहे. (Pune Crime News)
पुणे विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई ६ डिसेंबर रोजी पुणे विमानतळावर करण्यात आली. एअर इंडिया एक्सप्रेस आय एक्स २४१ या विमानाने एक महिला प्रवासी बँकॉकवरुन पुणे विमानतळावर पोहचली. एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी त्या महिलेला चौकशीसाठी अडवले आणि तिच्या बॅगची तपासणी करायला सुरुवात केली. यावेळी त्यातील २ चिप्सच्या डब्यात या महिलेने लपवलेला गांजा आढळून आला. त्याचे वजन केले असता ते ७२२ ग्रॅम इतके मिळून आले ज्याची बाजार भावानुसार ७२.२ लाख रुपये किंमत आहे. संबंधित महिलेवर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिप्सच्या डब्ब्यांमधून ही महिला चक्क बँकॉक ते पुणे गांजाची तस्करी सुरू होती. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंटेलिजन्स युनिटने ही मोठी कारवाई केली आहे. या गांजाची किंमत तब्बल ७२ लाख रुपये आहे. विशेष म्हणजे, हा गांजा अत्यंत चलाखीने चिप्सच्या डब्यांमध्ये लपवण्यात आला होता. (Pune Crime News)
Pune Crime News: बँकॉकहून आली होती ‘ती’ महिला प्रवासी
पुणे विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने ६ डिसेंबर रोजी पुणे विमानतळावर तपासणीवेळी ही कारवाई केली आहे. एअर इंडिया एक्सप्रेसच्या आय एक्स २४१ (IX 241) या विमानाने महिला प्रवासी थेट बँकॉकहून पुण्यात दाखल झाली होती. अधिकाऱ्यांनी काही संशयाच्या आधारावर या महिलेला थांबवून चौकशी सुरू केली. तिच्या बॅगांची तपासणी करत असताना हा गांजा सापडला आहे.
Pune Crime News: चिप्सच्या डब्ब्यामध्ये लपवला होता गांजा
अधिकाऱ्यांनी महिलेच्या बॅगेची तपासणी सुरू केली, बॅगेत ठेवलेल्या चिप्सचे दोन डबे आढळून आले. त्या डब्ब्यांमध्ये हा गांजा चलाखीने लपवण्यात आला होता.
Pune Crime News: ७२२ ग्रॅम वजन असलेल्या गांजाची ७२.२ लाख किंमत
विमानतळावर जप्त केलेल्या गांजाचे वजन ७२२ ग्रॅम इतके भरले. आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजित बाजारभावानुसार या गांजाची किंमत ७२.२ लाख रुपये इतकी मोठी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा पुण्यात नेमका कशासाठी आणला जात होता आणि यामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ संबंधित महिलेवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या महिलेची कसून चौकशी सुरू केली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.