FDA ची थातूरमातूर कारवाई, भाजप आमदारांकडून वाभाडे; मंत्री नरहरी झिरवाळ हतबल; सभागृहात नेमकं काय

महाराष्ट्र हिवाळी अधिवेशन 2025: विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Winter Session 2025)  एफडीएच्या (FDA) कामकाजावर सत्ताधारी भाजपचे (BJP) आमदार नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. भर सभागृहात आमदार विक्रमसिंह पाचपुते (Vikram Pachpute) यांनी एफडीएचे कामकाज थातूरमातूर आणि ढिसाळ असल्याचे स्पष्ट करत एफडीए विभागाचे कान टोचले.

Vikram Pachpute: आमदार विक्रमसिंह पाचपुतेंनी टोचले एफडीएचे कान

भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते म्हणाले की, या आधीच्या अधिवेशनात मी ॲनालॉग  चीज आणि फेक पनीरचा मुद्दा मांडला होता, हा मुद्दा मांडल्यानंतर केंद्र सरकारच्या एफएसएसआय संस्थेने हा विषय गांभीर्याने घेतला. ज्यावेळेस सभागृह सुरू असते त्याच वेळेस एफडीएच्या कारवाया होतात. यावर्षी या सेशनमध्ये एफडीए डिपार्टमेंटचा एकही प्रश्न नव्हता, त्यामुळे कोणतीही कारवाई झाले नाही. दोन महिन्यापूर्वी 25 मुलांचा कफ सिरफमुळे मृत्यू झाला. ही परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात सुद्धा उद्भवू शकते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात 200 कोटी रुपयांची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात फक्त 30 कोटी रुपये मिळाले. या डिपार्टमेंटला सुधारवायचे असेल तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे या डिपार्टमेंटची कुठेच ॲक्शन दिसत नाही. अधिवेशन आले की फक्त या डिपार्टमेंटची ॲक्शन दिसते, असे म्हणत त्यांनी एफडीए विभागाचे कान टोचले.

Sudhir Mungantiwar: सुधीर मुनगंटीवारांची टीका

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील एफडीएच्या कामकाजावर टीका करत म्हटले की, शासन गंभीर नाही, शब्द देऊन पैसे देत नाहीत. बिंदू नामावलीमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीकोनातून एकही पाऊल उचलले गेलेले नाही. फक्त 90 अधिकार्‍यांच्या नावावर कारभार सुरु आहे, बाकी अधिकारी नवीन प्रशिक्षण घेऊनही नियुक्तीची प्रतिक्षा करत आहेत. तर मंत्री नरहरी झिरवळ यांनी एफडीएच्या ढिसाळ नियोजनाची कबुली दिल्याचे पाहायला मिळाले.

Prakash Abitkar: साथ रोगाने महाराष्ट्र हैराण

दरम्यान, महाराष्ट्रात यंदा साथ रोगाचे रुग्ण गतवर्षीच्या तुलनेत वाढले आहेत, मात्र मृत्यू दर तुलनेने कमी असल्याचे चित्र समोर आले आहे. विधानसभेत मंत्री प्रकाश आबिटकरांकडून लेखी उत्तराद्वारे या संदर्भात माहिती सादर करण्यात आली. कोविडमुळे 46 जणांचा मृत्यू झाला, तर हिवतापामुळे 20 जणांचा मृत्यू झाला. याउलट, गॅस्ट्रो, अतिसार आणि विषमज्वर यांमुळे यंदा एकही मृत्यू झाला नाही. मागील वर्षी कोविडमुळे 35 जणांचा मृत्यू झाला होता; यावर्षी हा आकडा वाढून 45 झाला आहे. म्हणून, कोविडमुळे रुग्णसंख्या वाढली असली, तरी इतर साथीच्या आजारांमुळे मृत्यू कमी आहेत.

मंत्री आबिटकर यांनी यासाठी पुढील उपाययोजना सादर केल्या आहेत. 13 महापालिकांमध्ये सर्वेक्षण करुन साथीच्या आजाराचा अभ्यास केला जाणार आहे. डासांचे उत्पन्न रोखण्यासाठी गप्पी मासे सोडण्यात येत आहेत, ज्यामुळे पाण्याच्या स्त्रोतांमध्ये रोगजनक घटक नियंत्रित होतील. जनजागृती मोहिम राबविली जाणार आहे. तसेच वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांना आणि डॉक्टरांना प्रशिक्षित केले जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

आणखी वाचा

VIDEO : नितेश राणेंकडून भास्कर जाधवांचं कौतुक, बाजूला बसलेल्या आदित्य ठाकरेंनी लगेच मिठी मारली, सभागृहात काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.