Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप

मुंबई : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral video) झाला असून एका बुरखाधारी मुलीच्या चेहऱ्यावरील बुरखा ते स्वत:च्या हाताने खाली सरकवत असल्याचं दिसून येतं. पाटणा येथे आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्राचे वाटप मुख्यमंत्र्‍यांच्या हस्ते करण्यात येत होते. याच कार्यक्रमातील नितीश कुमार यांच्या व्हिडिओवरुन वाद राजकीय वादाला फोडणी मिळाली आहे. सोशल मीडियावरील या व्हायरल या व्हिडिओवरुन आता राजद थेट नितीश कुमार यांच्या मानसिकतेवरच हल्लाबोल केला. आरजेडीच्या अधिकृत ट्विटर हँलडवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. नितीश बाबू आता 100 टक्के संघी झाले आहेत, असेही आरजेडीने म्हटले.

लालू प्रसाद यादव यांच्या राजद पक्षाने म्हणजेच आरजेडीने व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये, हिजाब परिधान केलेल्या एका महिलेच्या चेहऱ्यावरील हिजाब बाजुला काढताना मुख्यमंत्री नितीश कुमार दिसून येतात. नितीश कुमारांना हे काय झालंय? त्यांची मानसिक स्थिती आता अतिशय दयनीय झाली आहे, किंवा नितीश बाबू 100 टक्के संघी बनले आहेत, अशी बोचरी टीका राजद पक्षाने केली आहे. तर, काँग्रेसनेही या व्हायरल व्हिडिओवरुन संताप व्यक्त करत, हे कृत्य माफी योग्य नाही असे म्हटलं आहे.

हे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आहेत. यांचा निर्लज्जपणा बघा, जेव्हा एक महिला डॉक्टर आपले नियुक्तीपत्र घेण्यासाठी आली असता, नितीश कुमारांनी तिच्या चेहऱ्यावरुन हिजाब काढला. बिहारच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीने जाहीरपणे असे नीच कृत्य केलं आहे. विचार करा, राज्यातील महिला किती सुरक्षित आहेत? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. नितीश कुमारांनी या कृत्याबद्दल तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, हे माफीलायक नाही, असेही काँग्रेसने म्हटलं.

बिहार काँग्रेसनेही नितीश कुमार यांच्या व्हिडिओवरुन संताप व्यक्त केला आहे. नितीश कुमार यांचे हे कृत्य अत्यंत लाजीरवाणे आणि निषेधार्ह आहे. जर राज्याचे प्रमुखच सर्वांदेखत उघडपणे असे कृत्य करत असतील तर, राज्यातील महिलांच्या सुरक्षेचं काय? असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे.

हेही वाचा

निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् 2069 सदस्यसंख्या

आणखी वाचा

Comments are closed.