शासनाला चुना लावून शिक्षाही झाली, आतातरी कोकाटेंचा राजीनामा घेणार का? रोहित पवारांचा सवाल

मुंबई : आधी शेतकऱ्यांचा अवमान केला, ऑनलाईन पत्तेही खेळून झाले आणि आता शासनाला चुना लावल्याप्रकरणी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (माणिकराव कोकाटे) यांना दोन वर्षांची शिक्षा झाली. त्यामुळे आतातरी त्यांचा राजीनामा घेणार का असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी विचारला. कायम नैतिकतेच्या गप्पा हाणत नाकाने कांदे सोलणारे सरकार अजून किती दिवस त्यांना वाचवणार हे बघायचं आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याप्रकरणी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दोन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. त्यामुळे ते अडचणीत आले असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. याच मुद्द्यावरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली.

रोहित पवार पोस्ट: काय म्हणाले रोहित पवार?

बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेली 2 वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम केल्यानंतर तरी आता सरकारने मंत्री माणिकराव कोकाटे यांची तातडीने पदावरुन हकालपट्टी करावी. शेतकऱ्यांचा अवमान करुन झाला, ऑनलाईन पत्ते झाले आणि आता शासनालाच चुना लावल्याप्रकरणी शिक्षाही कायम झाल्याने कायम नैतिकतेच्या गप्पा हाणत नाकाने कांदे सोलणारं हे सरकार त्यांना आणखी किती दिवस वाचवतंय हेच बघायचंय… माझा न्याययंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळं माझ्या विरोधात कोकाटे यांनी दाखल केलेला कथित मानहानीचा दावाही न्यायालय असाच फेटाळून लावेल!

कायमच चुकीची कामं करणाऱ्यांची पाठराखण करणाऱ्या भाजपाची न्यायालयाकडून चोहोबाजूने कोंडी होताना दिसते. मंत्री शिरसाठ यांनाही न्यायालयाने असंच फटकारलं, पण सरकार त्यांना वाचवतंय. तसंच नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी इडीने दाखल केलेलं आरोपपत्रही न्यायालयाने फेटाळून लावलं. त्यामुळं ईडीच्या आडून राजकीय हल्ले करणाऱ्या सरकारचा मुखवटा टराटरा फाटला.. आता दिल्लीच्या कोर्टात टांगली गेलेली स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी तरी भाजपाने माफी मागावी..!

माणिकराव कोकाटे गृहनिर्माण घोटाळा : कोकाटेंना दोन वर्षांची शिक्षा कायम

राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत आले आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याप्रकरणी माणिकराव कोकाटेंना झालेली दोन वर्षाची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी आणि पर्यायाने मंत्रिपद धोक्यात आलं आहे. शिवाय त्यांच्यावर अटकेचीदेखील टांगती तलवार आहे.

यापूर्वी प्रथम वर्ग न्यायालयाने त्यांना सुनावलेली शिक्षा वरच्या कोर्टात कायम ठेवण्यात आली आहे. शासकीय कोट्यातील दहा टक्के सदनिका गैरव्यवहारप्रकरणी, दोन वर्षे कारावास आणि दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यामुळे यातून दिलासा मिळण्यासाठी मंत्री कोकाटे आता उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची शक्यता आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.