गुहागरमध्ये सुन्न करणारी घटना! अल्पवयीन मुलीला समुद्रकिनारी नेत दारू पाजली, लैंगिक अत्याचार करत
रत्नागिरी गुन्हे: रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीला समुद्रकिनाऱ्यावर नेत नराधमाने मद्य पाजत लैंगिक अत्याचार केला नंतर रात्री जबरदस्तीने तिला लॉजवर देखील नेल्याचा प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (Guhagar Crime) मुलगी रात्रभर घरी न आल्याने पालकांनी पोलिसात मुलगी हरवल्याची तक्रार केली. मात्र दुपारी स्वतःच घरी आलेल्या मुलीच्या अवस्था पाहून तिच्या पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. मुलीच्या चौकशी अंती ही धक्कादायक बाब समोर आली असून आरोपी प्रितेश सुर्वे (29) नराधमाला गुहागर पोलिसांनी अटक केली आहे. गुहागर पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जग चित्र घटनेने संपूर्ण गुहागरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. (Crime news)
Guhagar Crime News: नेमका प्रकार काय?
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये आरोपी प्रितेश सुर्वे (वय 29) या नराधमाने गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरायला नेत तिला दारू पाजली. तिच्यावर दिवसभर लैंगिक अत्याचार केला. रात्री जबरदस्तीने तिला लॉजवर नेलं. मुलगी रात्रभर घरी न आल्याने पालकांनी गुहागर पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार केली. मात्र दुपारी स्वतः घरी आलेल्या मुलीच्या अवस्था पाहून चौकशी अंती ही संताप जनक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर गुहागर पोलिसांनी आरोपी प्रितेश सुर्वे याला अटक केली असून त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लैंगिक अत्याचाराच्या या गंभीर घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
Pune Crime:चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीला घरापासून दूर नेलं; अत्याचार केला अन् संपवलं
आणखी वाचा
Comments are closed.