भावाच्या नावावर मतदानाचा प्रयत्न फसला, बोगस मतदार पोलिसांच्या ताब्यात; नाशिकच्या सिन्नरमधील खळब
Sinnar Nagarparishad Election 2025: राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यांतील एकूण 143 सदस्यपदांसाठी आज (20 डिसेंबर) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार असून नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांच्या मतदानादरम्यान सिन्नर (Sinnar) शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
सिन्नर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील मतदान केंद्रावर बोगस मतदार पकडल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. आज सकाळपासून सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान एक मतदार संशयास्पदरीत्या मतदानासाठी आल्याचे लक्षात आल्यानंतर निवडणूक कर्मचाऱ्यांनी तात्काळ चौकशी केली. चौकशीत सदर व्यक्ती बनावट आधार कार्डच्या आधारे आपल्या भावाच्या जागेवर मतदान करण्यासाठी आल्याचे उघड झाले.
Sinnar Nagarparishad Election 2025: बनावट ओळखपत्राच्या आधारे मतदानाचा प्रयत्न
मतदान अधिकाऱ्यांनी सतर्कता दाखवत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्यानंतर त्याला पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकारामुळे काही काळासाठी संबंधित मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली होती. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
Senner NagaARPAPRAPERS ELance
या घटनेमुळे निवडणूक यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले असले तरी, अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे संभाव्य गैरप्रकार वेळीच रोखण्यात यश आले आहे. निवडणूक आयोगाकडून या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवण्यात येण्याची शक्यता आहे.
Sinnar Nagarparishad Election 2025: सिन्नर, ओझर, चांदवड येथे सहा जागांसाठी आज मतदान
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, ओझर आणि चांदवड नगरपरिषदेच्या एकूण सहा जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सिन्नरमधल्या तीन, ओझरच्या दोन तर चांदवडच्या एका जागेसाठी आज मतदान पार पडत आहे.
Sinnar Nagarparishad Election 2025: सिन्नरची निवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची
सिन्नर नगरपरिषदेची निवडणूक ही राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. माजी मंत्री माणिकराव कोकाटे आणि खासदार राजाभाऊ वाजे यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. महायुतीकडून नगराध्यक्षपदासाठी तिन्ही पक्षांनी उमेदवार उभे केले असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाने उमेदवार दिल्याने लढत अत्यंत चुरशीची झाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि भाजपला ठाकरेंच्या शिवसेनेकडून कडवे आव्हान उभे राहिले असून, त्यामुळे सिन्नरमधील निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.