कोकणातलं स्ट्रिंग ऑपरेशन महाराष्ट्रभर गाजलं; आज नगरपरिषदेचा निकाल, नितेश राणे की निलेश राणे, को
Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025: राज्यभरातील नगरपरिषद, नगरपंचायतींसाठीची (Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025) मतमोजणी आज (21 डिसेंबर) सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होईल. दुपारपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे. जामनेर, अनगर आणि दोंडाईचा या तीन नगरपंचायतीमधील सर्व जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. त्यामुळे आज एकूण 287 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतमोजणी होईल. केवळ महायुतीच नव्हे तर महाविकास आघाडीतील पक्षही ठिकठिकाणी एकमेकांविरुद्ध रिंगणात होते. त्यामुळे आजच्या निकालाबाबत कमालीची उत्सुकता आहे.
तळकोकणात कणकवली नगरपंचायत, मालवण नगरपरिषद, वेंगुर्ले नगरपरिषद, सावंतवाडी नगरपरिषदमध्ये पाच फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. काही वेळात मतमोजणी सुरू होणार असून निवडणूक आयोगाने तयारी केली आहे. भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे कारण भाजपाने जिल्ह्यात स्वबळाचा नारा देत निवडणुका लढवल्या होत्या. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मालवणमध्ये आमदार निलेश यांची प्रतिष्ठा पणाला लागली तर सावंतवाडी आणि वेंगुर्ले मध्ये दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
कोकणात कुठे कुठे राडे झाले? (Konkan Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025)
सिंधुदुर्ग- मालवणमध्ये शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी स्ट्रिंग ऑपरेशन करत भाजप पदाधिकारी पैसे वाटप करत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्याच्या गाडीत पैसे पकडले त्यावेळी देखील पोलिसांना मालवण पोलिस ठाण्यात जाऊन कारवाई करण्यास भाग पाडलं. भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिल्पा खोत यांचं जात प्रमाणपत्र खोट असल्याचा आरोप करत कोर्टात धाव घेतली. त्यामुळे शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांची मालवणमध्ये प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सोबत याआधी उबाठाचा नगराध्यक्ष होता त्यामुळे ही जागा उबाठाची पर्यायाने माजी आमदार वैभव नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सिंधुदुर्ग- कणकवलीमध्ये नितेश राणे यांच्या बालेकिल्ल्यात भाजप विरोध सर्वपक्षीय एकत्र येत नितेश राणेंना घेण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी शहर विकास आघाडीची स्थापना झाली. त्यात आमदार निलेश राणेंनी प्रतिनिधित्व केलं त्यामुळे राणे विरुद्ध राणे असा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. कणकवलीत मंत्री नितेश राणेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सिंधुदुर्ग– सावंतवाडी नगरपरिषद आणि वेंगुर्ले नगरपरिषदमध्ये आमदार दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण सावंतवाडी हा केदारकरांचा बालेकिल्ला असून भाजपने त्यांना घेरलं. तर वेंगुर्ले नगरपरिषद ही केसरकरांच्या मतदारसंघात असल्याने दोन्ही ठिकाणी त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मात्र याआधी देखील सावंतवाडी आणि वेंगुर्ले नगरपरिषदमध्ये भाजपची सत्ता होती.
कोकणातील मुख्य लढती-
सावंतवाडी-
श्रद्धा सावंत- भोसले (भाजप)
नीता सावंत- कविटकर (शिवसेना)
सीमा मतकर (उबाठा)
साक्षी वंजारी (काँग्रेस)
कणकवली नगरपरिषद- (Kankavali Nagarparishad)
समीर नलावडे (भाजप )
संदेश पारकर (उबाठा व शिंदे शिवसेना शहर विकास आघाडीच उमेदवार )
मालवण- (Nitesh Rane vs Nilesh Rane)
काचे हे झोपडी आहेत (भटब)
ममता वराडकर (शिवसेना)
पूजा कार्लकर (उबाठा)
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.