विखे-पाटलांनी राहाता नगरपालिकेचा गड राखला, नेवासामध्ये गडाखांचा गड आला पण सिंह गेला; संगमनेरमधी
Ahilyanagar District Nagarpalika Election Result 2025: अहिल्यानगर जिल्ह्यात राहाता नगरपालिकेचा गड विखे पाटलांनी राखला आहे. 20 पैकी 19 जागेवर भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांचा विजय झालाय. तर नेवासा नगरपालिकेत माजी आमदार शंकरराव गडाख यांचा गड आला पण सिंह गेला अशी परीस्थिती निर्माण झाली आहे. कारण 17 पैकी 10 जागेवर गडाखांचे उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र, नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय झालाय.
Rahata Nagarpalika Election Result 2025: राहाता नगरपालिका: विखे पाटलांनी गड राखला
राहाता नगरपालिकेत विखे पाटलांचा गड अखंड राहिला. नगरसेवक पदासाठी 20 पैकी 19 जागा भाजप–विखे पाटलांचा गट जिंकला, तर विरोधकांना फक्त एक जागा मिळाली. नगराध्यक्षपदासाठी स्वाधीन गाडेकर बहुमताने विजयी ठरले.
Deolali Pravara Nagarpalika Election Result 2025: देवळाली–प्रवरा नगरपालिका: चंद्रशेखर कदम यांचा विजय
देवळाली–प्रवरा नगरपालिकेत माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी सत्ता राखली. नगराध्यक्षपदासाठी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम विजयी ठरले. नगरसेवक पदासाठी 14 जागा भाजप, तर 4 जागा काँग्रेसला मिळाल्या, ज्यामुळे या नगरपालिकेत भाजप गटाचा बहुमत कायम राहिले आहे.
Newasa Nagarpalika Election Result 2025: नेवासा नगरपालिका: नगराध्यक्षपदावर विरोधक विजयी
नेवासा नगरपालिकेत माजी आमदार शंकरराव गडाख यांचा गड कायम राहिला, मात्र नगराध्यक्षपदावर विरोधक विजयी ठरला. नगरसेवक पदासाठी 17 पैकी 10 जागा गडाखांचे उमेदवार जिंकले, तर 6 जागा महायुती, 1 जागा आम आदमी पार्टीला मिळाली.
संगामेर नगरपालिका निवडणूक निकाल 2025: मंडळीची निवड
संगमनेर नगरपालिकेत संगमनेर सेवा समितीच्या नगराध्यक्ष उमेदवार मैथीली तांबे दहा हजार मतांनी निर्णायक आघाडीवर आहेत. शिवसेना–भाजप युतीच्या उमेदवार सुवर्णा खताळ पिछाडीवर आहेत. संगमनेर सेवा समितीचे 20 नगरसेवक विजयी झाले, तर महायुतीला अद्याप खाते उघडता आलेले नाही. उर्वरित 10 जागांची मतमोजणी सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.