सुहास कांदेंनी नांदगावचा गड राखला, शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी; राष्ट्रवादीचा धुव्वा, भुज’बळ’
Nandgaon Nagarparishad Election Result 2025: नांदगाव (जि. नाशिक) नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) मोठा विजय मिळवत नांदगावचा गड कायम राखला आहे. आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असून, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट)चे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच शिवसेनेचे 7 नगरसेवक बिनविरोध निवडून आले, ही ऐतिहासिक बाब ठरली आहे. दुसरीकडे भाजपला एकही जागा जिंकता आली नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्णपणे धुव्वा उडाल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा भुजबळांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Nandgaon Nagarparishad Election Result 2025: थेट नगराध्यक्षपदावरही शिवसेनेचा विजय
लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी शिवसेना (शिंदे गट) – भाजप युतीचे उमेदवार सागर हिरे यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार राजेश बनकर यांचा पराभव केला. या विजयामुळे नांदगाव नगरपरिषदेत शिवसेना (शिंदे गट)ची सत्ता निर्विवादपणे प्रस्थापित झाली आहे.
Manmad Nagarparishad Election Result 2025: मनमाड नगरपरिषद निवडणूक: शिंदे गट आघाडीवर
दरम्यान, मनमाड नगरपरिषद निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेचे योगेश पाटील आघाडीवर आहेत.
योगेश पाटील (शिंदे शिवसेना): 1952 मत
प्रवीण नाईक (ठाकरे सेना) : १९३१ मते
रवींद्र घोडेस्वार (राष्ट्रवादी अजित पवार): 720 मत
शिंदे शिवसेना आणि ठाकरे सेनेच्या उमेदवारांमध्ये फक्त 19 मतांची तंग आघाडी असून निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
Yeola Nagarparishad Election Result 2025: येवला नगरपरिषद निवडणूक: राष्ट्रवादी (अजित पवार) आघाडीवर
येवला नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार) उमेदवार राजेंद्र लोणारी पहिल्या फेरी अखेर 280 मतांनी आघाडीवर आहेत.
राजेंद्र लोणारी (राष्ट्रवादी): 4613 मत
रुपेश दराडे (शिवसेना): 4333 मत
या निकालामुळे येवल्यातील निवडणुकीत राष्ट्रवादी गटाची सध्याची आघाडी स्पष्ट झाली आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.