तासगावमध्ये आर.आर. आबांच्या लेकास दे धक्का;रोहित पाटलांचा पराभव, संजय काकांना अखेर गुलाल
सांगली – लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभेतल्या निवडणुकांमध्ये (Election) पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या माजी खासदार संजय काका पाटील यांना तासगाव नगर परिषदेत यश मिळाले. त्यामुळे, अखेर दोन पराभवाच्या नंतर संजय पाटील यांच्या अंगावर निवडणूक निकालाच्या निमित्ताने गुलाल उधळला गेलाय. येथील नगरपालिकेतील आर.आर. आबांचे सुपुत्र आमदार रोहित पाटील यांच्या आघाडीचा पराभव झाला आहे. त्यानंतर, संजय काका पाटील यांनी जनतेचे आभार मानले. तसेच, वाघाचं पिल्लू सर्कसवाल्यांच्या ताब्यात जाऊ देण्यापेक्षा जनतेनं पुन्हा सांभाळलं आहे. पोस्टर बॉयचा आता खऱ्या अर्थाने पंचनामा सुरू करतो, असे संजय पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले.
संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडी तासगाव नगर परिषदेवर आपली सत्ता मिळवली आहे. विजयानंतर संजय काकांनी विरोधी गट असलेल्या आमदार रोहित पाटील गटावर टीका केली. तासगावातील पोस्टर बॉईज चा पंचनामा सुरू करणार, असा इशाराच संजय काका पाटील यांनी तासगावातील विजय रॅली दरम्यान आमदार रोहित पाटील यांचे नाव न घेता दिला. काकांना संपवण्याचा काहींचा प्रयत्न होता. मात्र, जनतेने हे काय होऊ दिलं नाही, असेही संजय पाटील यांनी म्हटले.
हेही वाचा
मोठी बातमी! नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील 6 भाजप उमेदवारांचा पराभव; लोकांनी घराणेशाहीला नाकारले
आणखी वाचा
Comments are closed.