Sunil Shelke : कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर दादांच्या आमदाराला मंत्रीपदाची अपेक्षा! शेळके काय म्हणाले.
सुनील शेळके पुणे : मंत्री होण्याची महत्वकांक्षा प्रत्येकाची असते. म्हणूनचं मी 2024 च्या विधानसभा निकालानंतरही मंत्री पदाची जबाबदारी घ्यायला तयार होतो. असं म्हणत अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंनी (सुनील शेळके) मंत्री पदाची इच्छा अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली आहे. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेल्या मंत्री पदावर शेळकेंची वर्णी लागणार, अशी चर्चा सुरु आहे. 2024च्या विधानसभा निकालानंतर शेळकेंना मंत्रीपदाने हुलकावणी दिली होती, आता त्यांच्या पदरात मंत्रीपद पडेल, अशी मावळवासीयांना अन् स्वतः शेळकेंना ही अपेक्षा आहे. अजित दादा (Ajit Pawar) मला आज ना उद्या नक्की मंत्री पदाची संधी देतील, असा विश्वास ही शेळकेंनी व्यक्त केलाय.
Ajit Pawar NCP : राष्ट्रवादीत चुरस, मंत्रीपदावर वर्णीसाठी जोरदार लॉबिंग
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकांचा लाभ घेतल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरले आहे. दुसरीकडे उच्च न्यायालयाने कोकाटे यांना दिलासा दिला देत शिक्षेला स्थगिती दिली आहे. तसेच या याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. माणिकराव कोकाटेंना फक्त दोन वर्षांची शिक्षा असल्याने त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निकालानंतर याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात आजच जाणार आहेत. माणिकराव कोकाटे दोषी आहेत. त्यामुळं त्यांची आमदारकी जाणार असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. तर दुसरीकडे हीच आमदारकी वाचवण्यासाठी माणिकराव कोकाटे आता सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती आहे. असं असताना माणिकराव कोकाटे यांचे आमदारकीसह मंत्रिपद जाण्याची दाट शक्यता असताना दुसरीकडे राष्ट्रवादीत्यामुळे मंत्रीपदासाठी मोठी रस्सीखेच प्रारंभ असल्याचे चित्र आहे.
Comments are closed.