एकनाथ शिंदे, गिरीश महाजनांनी ताकद लावूनही अजित पवारांचा उमेदवार ‘दादा’ निघाला!

नंदुरबार निवडणूक निकाल : नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगरपालिकेवर (Taloda NagarPalika Election) अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP Ajit Pawar Faction) दणदणीत विजय मिळवला असून, या निकालाने महायुतीतील भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला (Shiv Sena) मोठा धक्का दिला आहे. या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी), शिंदे शिवसेनेचे दोन आमदार, तसेच भाजपचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि आमदारांनी जोरदार मोर्चेबांधणी करत सभा घेतल्या होत्या. मात्र, अखेर अजित पवारांचा उमेदवार सर्वांवर भारी पडला.

विशेष म्हणजे, भाजपकडून तिकीट न मिळाल्याने अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीत प्रवेश करत पूर्ण पॅनल उभे करणाऱ्या योगेश चौधरी गटाने नगराध्यक्षपदासह बहुमत मिळवले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेनगराध्यक्षपद जिंकत 11 नगरसेवक निवडून आणले, त्यामुळे स्पष्ट बहुमत प्राप्त झाले.

Nandurbar Election Result: तिरंगी लढतीत राष्ट्रवादीची बाजी

तळोदा नगरपालिकेसाठी यंदा भाजप, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात तिरंगी लढत झाली. मागील पंचवार्षिकमध्ये या पालिकेवर भाजपचा झेंडा होता. आमदार राजेश पाडवी यांच्या नेतृत्वाखाली अनेक दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने ही निवडणूक भाजपसाठी सोपी ठरेल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र, शिंदे शिवसेनेनेही स्वतंत्र उमेदवार दिल्याने राजकीय समीकरणे बदलली.

Nandurbar Election Result: भाजपमधील नाराजी राष्ट्रवादीसाठी फायदेशीर

भाजपमध्ये नगराध्यक्षपदासाठी अनेक इच्छुक होते. मात्र, शेवटच्या क्षणी तिकीट नाकारल्याने नाराज झालेले योगेश चौधरी यांनी तात्काळ निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला. त्यांनी आपल्या पत्नी भाग्यश्री योगेश चौधरी यांचा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि संपूर्ण पॅनल उभे केले. भाजपकडून उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा फोल ठरल्याने चौधरी यांनी पक्षांतराचा मार्ग स्वीकारला आणि हाच निर्णय राष्ट्रवादीसाठी निर्णायक ठरला. प्रभाग क्रमांक 9 मधील दोन जागा आणि प्रभाग क्रमांक 8 मधील एक जागा वगळता इतर सर्व जागांसाठी राष्ट्रवादीने उमेदवार दिले.

Nandurbar Election Result: महायुतीकडून जोरदार प्रचार, तरीही अपयश

शिंदे शिवसेनेच्या उमेदवार हितेंद्र क्षत्रिय यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तळोद्यात सभा घेतली. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमश्या पाडवी यांनीही पूर्ण ताकद पणाला लावली. तर भाजपच्या उमेदवार जितेंद्र सूर्यवंशी यांच्या प्रचारासाठी भाजपचे ‘संकटमोचक’ गिरीश महाजन यांनी सभा घेतली. आमदार राजेश पाडवी यांनीही प्रचारात सक्रिय सहभाग घेतला.

Nandurbar Election Result: आमदार नसतानाही राष्ट्रवादीचा विजय

दुसरीकडे, नंदुरबार जिल्ह्यात अजित पवार गटाचा एकही आमदार किंवा खासदार नसतानाही राष्ट्रवादीने ही निवडणूक जिंकली. नंदुरबारचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे, आमदार सना मलिक यांनी सभा घेतल्या. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पॅनल प्रमुख योगेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी प्रचार यंत्रणा राबवण्यात आली. याचा परिणाम म्हणून नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाग्यश्री योगेश चौधरी यांनी भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांचा तब्बल 3,428 मतांनी पराभव केला.

Nandurbar Election Result: नगरसेवकांच्या जागांचा निकाल

तळोदा नगरपालिकेतील 10 प्रभागांतील 21 नगरसेवक पदांच्या जागांपैकी

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – 11 जागा

शिवसेना (शिंदे गट) – 6 जागा

भारतीय जनता पक्ष – 4 जागा

असा निकाल लागला आहे.

आणखी वाचा

Jalgaon Election Result: जळगावात शिंदे गटाचे आमदार ठरले ‘धुरंधर’, पण गुलाबराव पाटलांचा बालेकिल्ला ढासळला, नगरपरिषदेत मोठा धक्का

आणखी वाचा

Comments are closed.