बीसीसीआयकडून ‘रो-को’चा व्हिडीओ पोस्ट, चाहते संतापले…, रोहित शर्मा अन् विराट कोहलीने शतक ठोकल्
विराट कोहली रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफी : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाला (BCCI) सध्या सोशल मीडियावर चाहत्यांच्या तीव्र टीकेला सामोरे जावे लागत आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या चालू हंगामात विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जबरदस्त खेळीचे हायलाइट्स व्हिडीओ पोस्ट केले आहेत. तरी चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. सोशल मीडियावर टोमणे मारत अनेक जण हे व्हिडीओ “Nokia 7650 वरून रेकॉर्ड केलेल्या CCTV फुटेजसारखे” असल्याची खिल्ली उडवत आहेत.
Nokia 7650 मध्ये रेकॉर्ड केलेले 🤡
— परिवेश (@ForeverImvKohli) 24 डिसेंबर 2025
विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्याच दिवशी विराट कोहली आणि रोहित शर्माने बराच काळानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. मात्र बीसीसीआयच्या मर्यादित ब्रॉडकास्ट व्यवस्थेमुळे दोन्ही सामन्यांचे थेट प्रक्षेपण किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग होऊ शकले नाही. त्यात विराटचा दिल्ली विरुद्ध आंध्र प्रदेश सामना बंगळुरूमध्ये बंद दाराआड खेळवण्यात आला. या सामन्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेशाची परवानगीही नव्हती.
सीसीटीव्ही फुटेज 🤔🤔
— 𝐕𝐢𝐧𝐚𝐲 𝟏𝟖 ᡣ𐭩 (@ItsVinayPKVK) 24 डिसेंबर 2025
विराट कोहलीची ऐतिहासिक खेळी
बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये झालेल्या या सामन्यात विराट कोहलीने तब्बल 12 वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीत खेळताना 101 चेंडूत 131 धावांची अफलातून खेळी साकारली. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 3 षटकार ठोकले. या शतकी खेळीमुळे विराटने दिल्लीसाठी केवळ 17व्या लिस्ट-ए डावात 1000 धावांचा टप्पा पार केला. याशिवाय, लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 16,000 धावा पूर्ण करणारा फलंदाज बनत त्याने सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले.
सर्वात श्रीमंत मंडळाचा हा व्हिडिओ गुणवत्ता किती आहे? 😭 pic.twitter.com/8nmOpSzswC
— मॅग्नम (@magnum_vk18) 24 डिसेंबर 2025
रोहित शर्माचा वादळी अवतार
दुसरीकडे, जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर रोहित शर्माने मुंबईकडून खेळताना सिक्कीमविरुद्ध तुफानी फलंदाजी केली. रोहितने 94 चेंडूत नाबाद 155 धावा केल्या, ज्यात 18 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश होता. त्याने केवळ 62 चेंडूत आपले 37वे लिस्ट-ए शतक पूर्ण केले आणि पुढे त्याला मोठ्या शतकात रूपांतरित केले. मुंबईने 237 धावांचे लक्ष्य सुमारे 20 षटके शिल्लक असतानाच 8 विकेट्सनी सहज पार केले.
𝗥𝗼𝗵𝗶𝘁 𝗦𝗵𝗮𝗿𝗺𝗮 𝗦𝗵𝗼𝘄 🍿
1⃣5⃣5⃣ धावा
9⃣4⃣ चेंडू
1⃣8⃣ चौकार
9⃣षटकाररोहित शर्माने पुनरागमनाची घोषणा केली #विजय हजारेट्रॉफी सिक्कीम विरुद्ध संस्मरणीय खेळीसह भव्य फॅशन 🔥@IDFCFIRSTBank | @ImRo45 pic.twitter.com/cuWMUenBou
— BCCI डोमेस्टिक (@BCCIdomestic) 24 डिसेंबर 2025
ब्रॉडकास्टअभावी चाहत्यांचा संताप
या दोन्ही खेळी असूनही बीसीसीआय एकाही सामन्याचे थेट प्रक्षेपण करू शकले नाही. फक्त अहमदाबाद आणि राजकोट येथे सुरू असलेले सामनेच टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात आले. चाहत्यांची उत्सुकता पाहता बोर्डाने ‘BCCI Domestic’ या एक्स (ट्विटर) हँडलवर दोन्ही शतकांचे हायलाइट्स शेअर केले, मात्र अतिशय खराब व्हिडीओ क्वालिटीमुळे चाहत्यांचा संताप आणखी वाढला.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.