कोल्हापूरच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, कृष्णराज महाडिक महानगरपालिकेची निवडणूक लढणार?
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2026: आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी घडामोड समोर आली आहे. कोल्हापूरच्या राजकारणात आता भाजपचे राज्यसभा खासदार धनंज महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक (Krishnaraj Mahadik) यांची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. कृष्णराज महाडिक हे कोल्हापूर महानगरपालिकेची (Kolhapur Mahangarpalika Election 2026) आगामी निवडणूक लढवू शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार, कृष्णराज महाडिक हे कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनमधून रिंगणात उतरु शकतात. तसे घडल्यास कोल्हापूरच्या राजकारणात महाडिकांची तिसरी पिढी उतरणार आहे. त्यामुळे आता कोल्हापूरकरांना कृष्णराज महाडिक खरोखरच महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, याची उत्सुकता लागली आहे. (Kolhapur News)
कृष्णराज महाडिक यांनी यापूर्वी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी केली होती. मात्र, त्यांना संधी मिळाली नव्हती. मात्र, आता कृष्णराज महाडिक महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून कोल्हापूरच्या राजकारणात एन्ट्री करण्याची शक्यता आहे. कृष्णराज महाडिक यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केल्याचीही माहिती आहे. कृष्णराज महाडिक यांनी उमेदवारी अर्ज विकत घेतला असला तरी तो दाखल करणार का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारण कृष्णराज महाडिक हे विधानसभेत जाण्यासाठी इच्छूक होते. 2024 ची निवडणूक झाल्यानंतर ते पुढील विधानसभेच्या तयारीला लागले होते. अशावेळी ते कोल्हापूर महानगरपालिकेच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर आल्याने नवा ट्विस्ट आला आहे. त्यामुळे आता कृष्णराज महाडिक याबाबतची अधिकृत घोषणा कधी करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
कृष्णराज महाडिक हे नाव कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध आहे. कृष्णराज महाडिक हे सोशल मीडियावर बरेच सक्रिय आहेत. ते अनेकदा सोशल मीडियावरुन कोल्हापूरमधील सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर टिप्पणी करत असतात. सोशल मीडियावर ते क्रिश महाडिक या नावाने प्रसिद्ध आहेत. क्रिश महाडिक युट्यूबवर कधी गावचा रस्ता दुरुस्त करतानाचा किंवा तर कधी चक्क गावात घरोघरी जाऊन कचरा गोळा करताना दिसून आले आहेत. त्यामुळे कृष्णराज महाडिक हे कोल्हापूरमध्ये सातत्याने चर्चेचा विषय असतात.
Krishnaraj Mahadik & Satej Patil: कृष्णराज महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी अलीकडेच कोल्हापूर महानगरपालिकेसाठी ‘कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं’ अशी घोषणा दिली होती. या टॅगलाईनची कोल्हापूरमध्ये प्रचंड चर्चा रंगली होती. याबाबत कृष्णराज महाडिक यांनी एक टिप्पणी केली होती. ज्या लोकांनी हा टॅगलाईन दिला आहे, तेच लोक अनेक वर्षे महानगरपालिकेत सत्तेत होते. त्या काळात कोल्हापूरच्या अपेक्षित विकासासाठी ते का अपयशी ठरले? आज देशात जनतेचा विश्वास आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर आहे. केंद्रापासून राज्यापर्यंत आणि आता जिल्ह्यापर्यंत. हा विश्वास केवळ शब्दांवर नाही, तर कामगिरीवर आधारित आहे. कोल्हापूरसाठी खरा आणि सकारात्मक बदल हवा असेल, तर देश व राज्य चालवणाऱ्या नेतृत्वाच्या पाठिंब्याने काम करणाऱ्या उमेदवारांना संधी देणे आवश्यक आहे. अशा नेतृत्वाखाली काम करणारे लोक नक्कीच प्रामाणिकपणे मेहनत घेतील आणि जनतेच्या हिताचे ठोस परिणाम देतील, याची मला पूर्ण खात्री आहे. आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास, माझ्याशी संपर्क साधावा. कृष्णराज महाडिक यांच्या कमेंटला ही बातमी लिहित असताना 914 जणांनी लाईक केलं आहे.
आणखी वाचा
तेच कुंकू, तोच ड्रेस, कृष्णराज महाडिकांसोबतच्या फोटोनंतर रिंकू राजगुरुच्या सूचक स्टेटसची चर्चा!
आणखी वाचा
Comments are closed.