ठाकरेंच्या युतीनंतर काल पेढे वाटणारे विनायक पांडे आज भाजपात, आमदार देवयानी फरांदेंचा कडाडून विर
नाशिक: नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या (Mahanagarpalika Election 2026) अनुषंगाने काही महत्त्वाच्या नेत्यांचे पक्षप्रवेश आज पार पडणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर आणि काँग्रेसच्या एका नेत्याचा आज भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या पक्षप्रवेशाना भाजप आमदार देवयानी फरांदे (evyani Farande) यांनी जाहीरपणे विरोध दर्शवला आहे. फरांदे यांनी त्यांच्या सोशल मिडीयावरती पोस्ट लिहून आज होत असलेल्या पक्षप्रवेशाला विरोध दर्शवला आहे, “प्रभाग क्रमांक १३ मध्ये होणाऱ्या आजच्या प्रवेशाला माझा स्पष्ट विरोध आहे. तसेच प्रस्थापितांच्या विरोधात ठामपणे लढा देणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मी खंबीरपणे पाठीशी आहे. सदर विषयाबाबत निवडणूक प्रमुख म्हणून मला कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही”, असं फरांदेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.(Mahanagarpalika Election 2026)
“प्रभाग क्रमांक १३ मध्ये होणाऱ्या आजच्या प्रवेशाला माझा स्पष्ट विरोध आहे. तसेच प्रस्थापितांच्या विरोधात ठामपणे लढा देणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मी खंबीरपणे पाठीशी आहे. सदर विषयाबाबत निवडणूक प्रमुख म्हणून मला कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही.”
जय श्री राम… pic.twitter.com/Qv2bp7mzzt— आमदार देवयानी फरांडे (@PharandeDevyani) 25 डिसेंबर 2025
नाशिकमध्ये आज मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ, शाहू खैरे यांचा पक्षप्रवेश होणार आहे, तर या पक्षप्रवेशाला देवयानी फरांदे यांनी जाहीर दर्शवला आहे. यामुळे आता नाशिकमधील भाजपची अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली आहे.
Nashik News: फरांदेंसोबत स्थानिक भाजप पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांकडून विरोध
नाशिकमध्ये आज प्रभाग 13 मध्ये होणाऱ्या भाजप प्रवेशाला स्थानिक भाजप पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांकडून विरोध दर्शवला जात आहे. आमदार देवयानी फरांदे यांनी देखील प्रवेशाला विरोध दर्शवला आहे. नाराज भाजप पदाधिकाऱ्यांकडून आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहेत, ज्यांनी आजपर्यंत हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका घेतली अशा लोकांना लाल कार्पेट पक्ष देत असेल तर आम्ही निष्ठावंत म्हणून काम करत आहोत, तर आमच्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही असा आमचा पक्षावर विश्वास आहे, असं म्हणत भाजप कार्यालयाच्या बाहेर विरोधात घोषणाबाजी केली जात आहे.
Nashik News: मनसे-शिवसेना युतीची घोषणा साजरी केली; पेढे भरवले अन्..
ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर भाजपने नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे, ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर जल्लोष करणारे माजी महापौर विनायक पांडे हे भाजपच्या गळाला लागले आहेत. दोन्ही ठाकरेचे पदाधिकारी एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना एकमेकांना पेढे भरवत होते, विनायक पांडे यांनी तर ठाकरे बंधू सरकारचा सुफडा साफ करणार आशा वल्गना केल्या होत्या आणि आज तेच विनायक पांडे आज भाजपमध्ये दाखल होणार असून त्यांच्या सून अदिती पांडे ह्या भाजपकडून उमेदवार असणार आहेत, मनसेचे पहिले महापौर आणि गेल्या काही वर्षांपासून ठाकरेंच्या शिवसेनेत असणारे यतीन वाघ आणि काँग्रेसचे नगरसेवक शाहू खैरे हे देखील भाजप प्रवेश करणार आहेत.
हे सर्व जण प्रभाग तेरा मधून इच्छुक असून पॅनल निवडून आणण्याच्या दृष्टीने भाजपचे प्रयत्न सुरू आहे. मात्र याच प्रभागातून शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांचे पुतणे बबलू शेलार यांनी चार दिवसांपूर्वीच आमदार देवयानी फरांदे यांच्यां माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश केला होता, तिकिटच्या अपेक्षेनेच भाजप प्रवेश होता. यासह भाजपमधून इच्छुक असणाऱ्या देखील निवडणुकीची तयारी करत होते. मात्र आज भाजपमधेच आणखी प्रवेश होत असल्याने भाजपची डोकेदुखी वाढणार आहे, यावर कसा तोडगा काढला जातो याकडे लक्ष लागले आहे.
Nashik News: विनायक पांडेंनी सांगितलं ठाकरेंची सोबत सोडण्याचं कारण…
मागच्या निवडणुकीत तिकिटाच्या वेळी माझ्या मुलाचे तिकीट कापले. आता पुन्हा मुलाला तिकिटची मागणी केली होती. मुलाने मतदारसंघात कामही सुरू केले, पण यंदा ही तिकीट कापले. आता आम्ही सूनबाईला निवडणुकीत उतरवत आहोत, भाजपमधून ही उमेदवारी देण्यात आली आहे. आता आम्ही मनसे आणि शिवसेनेचा सुफडा साफ करणार आहोत. संजय राऊत यांच्यासोबत मी फोनवर चर्चा केली. पण त्यांनी तिकीटाबाबतीत ठोस सांगितले नाही. उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत मधले नेते जाऊ देत नाहीत. माझी नाराजी कोणावर नाही. आम्ही संपूर्ण पॅनल तयार केला आहे, पॅनल निवडून येणार, त्यांना उमेदवार ही मिळणार नाही, ठाकरे यांच्यावर नाराजी नाही स्थानिक पदाधिकारी यांच्याकडून डावलले गेले होते, आताही तसेच होत होते, त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आहे असं विनायक पांडेंनी पक्ष सोडताना म्हटलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.