ठाकरे बंधूंची ऐतिहासिक युतीच्या घोषणेवेळी निष्ठावंत ‘बाळा’ गैहजर; आता नांदगांवकर पोस्ट करत म्हण
Bala Nandgaonkar On Shivsena UBT MNS Alliance: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल मनसे आणि शिवसेनेच्या ऐतिहासिक युतीची घोषणा केली. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत देखील मंचावर उपस्थित होते. पत्रकार परिषदेसाठी ठाकरे बंधूंसह संजय राऊतांनाही एक खास खुर्ची ठेवण्यात आली होती. या दरम्यान, संजय राऊत उपस्थित असताना राज ठाकरेंचं निष्ठावंत म्हणून ओळख असणारे मनसेचे नेते बाळा नांदगावंकर युतीच्या घोषणेवेळी गैहजर होते. त्यामुळे बाळा नांदगांवकर नेमके कुठे आहेत, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. परंतु प्रकृतीच्या कारणास्तव बाळा नांदगांवकर ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेला अनुपस्थित होते, अशी माहिती समोर आले. आता बाळा नांदगांवकरांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले, असं म्हटलं आहे.
संयुक्त महाराष्ट्र म्हणजे मुंबईसह महाराष्ट्र मिळवण्यासाठी जी चळवळ झाली त्यामध्ये 107 हुतात्मे झाले, त्यानंतर आपल्याला आजचा महाराष्ट्र दिसतो ज्याची राजधानी मुंबई आहे. या चळवळीमध्ये अग्रणी नाव होत म्हणजे ‘ठाकरे’. प्रबोधनकारांपासून ठाकरे घराण्याला समाजकारणाचा वारसा आहे, त्याला राजकीय स्वरूप बाळासाहेबांनी दिले व त्यातुन ‘शिवसेना’ जन्माला आली. शिवसेनेने अनेक आंदोलने केली त्याचा फायदा विविध क्षेत्रातील मराठी मान्यवरांना झाला व मुंबईचे मराठीपण त्यातुन टिकून राहिले. मधल्या काही काळात दोघा भावंडांमध्ये वितुष्ट आले पण दोघांची महाराष्ट्रप्रेमाची व हिंदुत्वाची नाळ तुटली नाही व तुटणारही नाही, असं बाळा नांदगांवकरांनी सांगितले.
मुंबईवर आक्रमण करणाऱ्या परक्याना हरवू या- बाळा नांदगांवकर (MNS Shivsena UBT Yuti)
कोणताही वाद महाराष्ट्र धर्मापेक्षा मोठा नाही, या वाक्याला समजून दोन्ही भाऊ आज महाराष्ट्र व मुंबईच्या प्रेमासाठी एकत्र आले ही आपल्या मराठीजनमानसांसाठी मोठी गोष्ट आहे. केंद्रात व महाराष्ट्रात असलेल्या मराठीद्वेष्ट्या सरकारसाठी ही धोक्याची घंटा आहे. आत्ताची महापालिका निवडणूक ही नेहमीसारखी निवडणूक नाही तर मराठी माणसाच्या अस्तित्वाची निवडणूक आहे. 20 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे एकत्र येत आहे ते महाराष्ट्रासाठी, आपल्या माय मराठीसाठी.मुंबई तसेच महाराष्ट्र वर अधिकार हा पूर्वीही मराठी माणसाचा होता व पुढेही मराठी माणसाचाच राहील. कृपा करून गाफिल राहू नका, तुम्ही जागे व्हा दुसऱ्यांना जागे करा. आपल्यातील हेवेदावे बाजूला ठेवून आपल्या मुंबईवर आक्रमण करणाऱ्या परक्याना हरवू या. फक्त मुंबईचे मराठीपण व महाराष्ट्राचे हिंदुत्व राखण्यासाठी, सर्व मराठीजन एकत्र होऊया, असं बाळा नांदगांवकर म्हणाले.
बाळा नांदगांवकरांनी बाळासाहेबांना दिला होता शब्द- (Bala Nandgaonkar Post)
युतीसाठी जसं संजय राऊतांनी प्रयत्न केले, तसेच बाळा नांदगावकर हे सुद्धा युतीचे शिल्पकार आहेत. कारण राज उद्धव यांना एकत्र आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, मी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहणार, असा शब्द बाळा नांदगावकरांनी बाळासाहेब ठाकरेंना दिला होता. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव आज ते उपस्थित राहू शकले नाहीत.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची संपूर्ण पत्रकार परिषद, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.