अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर शरद पवार गट सकारात्मक, पुण्यानंतर ठाण्यात एकत्र येणार
ठाणे महापालिका निवडणूक राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे (Mahapalika Election) बिगुल वाजलं आहे. येत्या 15 जानेवारीला महापालिका निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गट आमि मनसेची या निवडणुकांसाठी युतीची घोषणा झाली आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्या देखील युतीसंदर्भात चर्चा सुरु आहे. दरम्यान, अशातच ठाणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात आघाडी होण्याची शक्यता आहे. कारण, अजित पवार गटाच्या प्रस्तावावर शरद पवार गटाचे देखील सकारात्मक उत्तर आले आहे. ठाण्यातील शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांचा देखील राष्ट्रवादीच्या युतीला होकार आहे.
जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार यांनी बोलणे केले तर नक्की काहीतरी होऊ शकेल
‘ठाण्यातील शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची भावना चांगली आहे, इतकी वर्ष आम्ही जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्व काम केले आहे. प्रस्ताव कोण देणार यापेक्षा भावना महत्वाची आहे. त्यांच्याकडून सकारात्मक भावना आली आहे, जर जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार यांनी बोलणे केले तर नक्की काहीतरी होऊ शकेल असे प्रधान म्हणाले. प्रश्न आहे की इलेक्शन आधी एकत्र यायचे की नंतर एकत्र यायचे. आधी जर एकत्र आलो तर नक्कीच कळवा मुंब्रा प्रमाणे ठाणे शहरात देखील राष्ट्रवादीची ताकद वाढेल असे मत मनोज प्रधान यांनी व्यक्त केले. त्यामुळं ठाण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास तयार आहे. पुढाकार कोण घेणार याकडे लक्ष असल्याचे मनोज प्रधान म्हणाले.
जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत : नजीब मुल्ला
जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत. 30 तारखेपर्यंत जर आम्हाला कोणाचा प्रस्ताव आला तर आम्ही देखील पक्ष श्रेष्ठी कडे पाठवणार आणि विचार करणार आहे. शेवटी कार्यकर्त्यांना निवडून आणायचे आहे, असे मत राष्ट्रवादी ठाणे जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी व्यक्त केले आहे. ठाणे शहरात जर पक्ष वाढवायचा असेल तर त्यांनी आता विचार करावा, असे नजीब मुल्ला यांनी वक्तव्य केले आहे. त्यामुळे ठाण्यातील शरद पवार देखील आता एक पाऊस पुढे टाकून अजित पवार गटासोबत युतीचा विचार करणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कालच महाविकास आघाडीची बैठक ठाण्यात पार पडली त्यात राष्ट्रवादी सोबत बोलणी झाली मात्र जागा वाटप अजून जाहीर झालेले नाही.
आणखी वाचा
Comments are closed.