कोहलीचा छोटा चाहता मॅच संपताच धावत आला, रोहित शर्मानं एका कृतीनं सर्वांची मनं जिंकली पाहा Video

जयपूर : रोहित शर्मानं जयपूरमध्ये मुंबईकडून सिक्कीम विरुद्धच्या सामन्यात दमदार कामगिरी केली. विजय हजारे ट्रॉफीतील या सामन्यात रोहित शर्मानं  94 बॉलमध्ये 155  धावा केल्या. यामुळं मुंबईनं सिक्कीमवर विजय मिळवला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रोहित शर्माला पाहण्यासाठी 10 हजार प्रेक्षक आले होते, त्यांनी रोहित शर्माच्या खेळाचा आनंद घेतला.

मॅच संपल्यानंतर एक अनोखं दृश्य पाहायला मिळालं. एक छोटा चाहता मैदानावर रोहित शर्माकडे धावत आला. छोटा चाहता रोहित शर्माच्या पाया पडून नमस्कार करणार होता. त्या चाहत्यानं विराट कोहलीच्या 18 क्रमांकाची कसोटीची जर्सी घातली होती. रोहित शर्मानं त्या छोट्या चाहत्याला मध्येच थांबवलं आणि त्याची गळाभेट घेतली. प्रेक्षकांसाठी हा क्षण आनंद देणारा ठरला. या प्रसंगाचा व्हिडिओचा व्हायरल होत आहे.

या मॅचमध्ये सिक्कीमनं प्रथम फलंदाजी करताना 7 विकेटवर 236 धावा केल्या होत्या.सिक्कीमनं अधिक धावा केल्या असत्या तर रोहित शर्माची फलंदाजी जास्त वेळ पाहता आली असतं, असं प्रेक्षकांना वाटत होतं. मुंबईनं हे आव्हान 30.3 षटकांमध्येच पूर्ण केलं. रोहित शर्मानं फटकेबाजी करत शतक पूर्ण केलं. रोहितनं या डावात 18 चौकार आणि 9 षटकार मारले.

दुसरीकडे विराट कोहलीनं दिल्लीकडून आंध्र प्रदेश विरोधात 101 बॉलमध्ये 131  धावा केल्या आहेत. दिल्ली विरुद्ध आंध्र प्रदेश ही मॅच बीसीसआयच्या बंगळुरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्स येथे होती. त्यामुळं इथ प्रेक्षक नव्हते. विराट कोहलीनं या मैदानावर शांतपणे फलंदाजी केली.

रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी विजय हजारे ट्रॉफीत दमदार कामगिरी करत स्टार खेळाडूंची उपस्थिती देशांतर्गत सामन्यांना देखील रोमांचक आणि लक्षवेधी बनवता येते हे दाखवून दिले.

आणखी वाचा

Comments are closed.