प्रशांत जगतापांचा काँग्रेस प्रवेश ठरला, पण उद्धव ठाकरेंनी लगेच फोन फिरवून मोठी ऑफर दिली, नेमकं
पुणे: पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महानगरपालिका निवडणुकीत एकत्रित लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत, गाठीभेटी, बैठका सुरू असतानाच या निर्णयाला विरोध करणारे पुण्याचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषद घेत राजीनामा दिला. प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तर प्रशांत जगताप हे आज काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रशांत जगताप आज काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत जगतापांचा पक्षप्रवेश होणार आहे, दुपारी १२ वाजता टिळक भवनला पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाकडून देखील प्रशांत जगताप यांना ऑफर असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रशांत जगताप यांना फोन केला होता. काल (गुरूवारी ता २५) रात्री उशिरा ९ मिनिट दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. तर शिवसेनेत या तुमचा योग्य सन्मान राखू. आम्ही भाजपा सोबत कदापी जाणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांची प्रशांत जगताप यांना ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी शिवसेना उबाठा गटाच्या अनेक नेत्यांनी प्रशांत जगताप यांना प्रवेशासाठी फोन केला होता. त्यावर ठाकरेंच्या नेत्यांना त्यांनी त्यांना सांगतिल होतं की, मी काँग्रेस विचारांचा आहे त्यामुळे मी तुमच्याकडे येऊ शकत नाही.
Prashant Jagtap news: प्रशांत जगतापांना कोणाची ऑफर दिली, नेमकं काय घडलं?
मी उद्धव ठाकरे आणि सचिन आहिर यांचे आभार मानतो. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याशी बोलायला त्यांनी वेळ दिला. या राज्यातील आक्रमक चेहरा आणि भाजपशी दोन हात करण्याची तयारी असलेला नेता माझ्याशी फोनवर बोलला. त्यांनी माझ्या भावना समजवून घेतल्या. तुम्ही आमच्या पक्षात काम करु शकता, असे त्यांनी सांगितले. मी भाजप किंवा महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये कुठेही जाणार नाही. आज मी माझ्या राजकीय जीवनाचा योग्य तो निर्णय घेईन. पण मी उद्धव साहेबांचा कायम ऋणी राहीन. त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची योग्यता समजून घेतली. पण पुढील दोन-तीन तासांमध्ये माझा निर्णय होईल.
माझी लढाई ही संविधानासाठी आणि पुरोगामी चळवळीसाठी आहे. ती कुठल्याही एखादा नेता आणि पक्षाच्या विरोधातील आहे. त्यामुळे आज जे भाजप सरकारला आव्हान देऊ शकतात, महायुती सरकारला आव्हान देऊ शकता, अशा पक्षाची निवड मी करेन.
आणखी वाचा
Comments are closed.