साताऱ्यात दहशत आणि नाद या वाक्यवरून महायुतीतल्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली; नेमकं काय घडलं?
सातारा बातम्या : सातारा जिल्ह्यात महायुतीमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ‘दहशत’ आणि ‘नाद’ या दोन शब्दांवरून भाजपचे मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना थेट इशारा दिल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. फलटण येथे झालेल्या भाजपच्या विजयी सभेत मंत्री जयकुमार गोरे यांनी दाढीवर हात फिरवत कोणतरी फलटणमध्ये आलं आणि शिवसेना दहशत खपवून घेणार नाही असं म्हणाले, त्यांना मला सांगायचे आहे दहशत आम्हाला पण चालत नाही आणि मला पण दाढी आहे, असं सांगत आमच्या नादाला लागायचे नाही, असा इशारा दिला होता. ज्यांनी ज्यांनी माझा नाद केला त्यांना मी सोडत नाही, अशी नाव न घेता टीका मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर केली होती.
जयकुमार गोरे यांच्यावर शंभूराज देसाई : जयकुमार गोरेरेंच्या टीकेला मंत्री शंभूराज देसाईंचे प्रत्युत्तर
दरम्यानाहीया टीकेला मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील उत्तर देत माझा नाद करायचा नाही, असं जयकुमार गोरे म्हणतायत याचाच अर्थ दहशत कोणाची आहे हे समजून जावं आणि मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, त्यामुळे दहशत खपवून घेणार नाही. निवडणुका असो-नसो मोकळ्या वातावरणामध्ये सगळ्यांनी काम केलं पाहिजे. नाद नाही करायचा असे गोरे मंत्री म्हणत असतील तर अप्रत्यक्ष त्यांनी मान्य केले आहे की दहशत त्यांची आहे. दहशत हा जिल्हा कधीच खपवून घेणार नाही. त्यामुळे इथून पुढे दादागिरी, दमदाटी, दहशतीची भाषा केली तर त्याला जशाच तसे उत्तर दिलं जाईल, अशा शब्दात शंभूराज देसाई यांनी गोरे यांना उत्तर दिलं आहे. एकूणच या अरे ला च्यारेच्या उत्तराने महायुतीतील दोन मोठ्या नेत्यामंध्ये चांगलीच जुंपल्याचे बघायला मिळालंहे.
रामराजे नाईक निंबाळकरांवर जयकुमार गोरे : जयकुमार गोरेरांचा रामराजे निंबाळकरांवर हल्लाबोल
भाजप नेते आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीबाबत भाष्य करत रामराजे निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्यावरती हल्लाबोल केला आहे. घाटावरचा सारखा खाली येतोय त्याची लायकी काय? अशी मला चिठ्ठी आली आहे. मी काय केलंय असंही विचारलं, मी सांगतो येताना टमटम घेऊन आलो आहे. आता टमटममध्ये बसल एवढेच राहिले आहे. माझ्या भागात विकासकामे झाली नाही पाहिजे म्हणून काम करणारा नेता. या भागातला दुष्काळ हटला नाही पाहिजे असा नेता, अनेक गोष्टी षडयंत्र करणारा नेता, म्हणून हा शकुनी मामा..काय होता तू काय झाला तू.. असा कसा शकुनी मामा बरबाद झाला तू.. अशा शब्दात जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी रामराजे निंबाळकरांवर (Ramraje Naik Nimbalkar) हल्लाबोल केला आहे.(Jaykumar Gore)
हेहि वाचा
आणखी वाचा
Comments are closed.