अमरावती महापालिकेसाठी महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर,महायुतीत कोण किती जागा लढणार?

अमरावती : विदर्भातील प्रमुख महापालिका असलेल्या अमरावती महापालिकेत पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी भाजप, शिवसेना आणि युवा स्वाभिमान यांच्या युतीची जागा वाटपाची चर्चा सुरु आहे. भाजप, शिवसेना यांच्या युतीची जागा वाटपाची अंतिम बैठक सुरु आहे. या बैठकीतून महायुतीसंदर्भात एक फॉर्म्युला समोर आलेला  आहे. त्यानुसार भाजप 45 ते 50 जागांवर लढेल. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला  18 ते  20 आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला  9 ते 12 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी महायुतीत भाजप आणि शिवसेनेसोबत नसल्याचं चित्र समोर आलं आहे.

अमरावतीचा जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला

भाजप आणि शिवसेनेची जागावाटप संदर्भात अंतिम बैठक सुरू आहे. शहरातील हॉटेल महफीलमध्ये महायुतीची बैठक  सुरु आहे. अमरावती महानगरपालिका मध्ये भाजप, शिवसेना (शिंदे) आणि युवा स्वाभिमान पार्टीची युती होणार आहे. भाजपचे आणि शिवसेनेचे नेते हॉटेल मध्ये पोहचले असून चर्चा सुरु आहे.

महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांची तीन – चार वेळा बैठक पार पडली आहे..

शिवसेनेला 87 पैकी 18 ते 20 जागा मिळतील. युवा स्वाभिमान पार्टीला 9 ते 12 जागा दिल्या जातील आणि भाजप 45 ते 50 जागेवर रिंगणात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाविकास आघाडीचं काय?

गेल्या निवडणुकीत अमरावतीकरांनी भाजपला बहुमत दिलं होतं. आता राज्याचं राजकारण बदललं आहे. शिवसेनेचे दोन गट पडलेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील फूट पडली. त्यामुळं आता काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या आघाडीचं काय असा प्रश्न आहे. याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका देखील अमरावती महापालिका निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाचे दोन आमदार आहेत. सुलभा खोडके आणि संजय खोडके हे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका जाहीर करतील.

अमरावती महापालिकेचा  2017 चा निकाल

2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपनं सत्ता मिळवली होती. भाजपचे 45 नगरसेवक त्यावेळी विजयी झाले होते. काँग्रेसनं 15 जागांवर विजय मिळवला होता. शिवसेनेला 7 जागांवर विजय मिळाला होता. विशेष बाब म्हणजे अमरावतीत गेल्या निवडणुकीत असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएमचे 10 नगरसेवक विजयी झाले होते. मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीचे 5 नगरसेवक विजयी झाले होते. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानचे 3 नगरसेवक विजयी झाले होते. आरपीआय आठवले गटाला एका जागेवर विजय मिळालेला तर एक अपक्ष विजयी झाला होता.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.