अजित पवार अचानक ‘नॉट रिचेबल’, पोलिसांचा फौजफाटा, पायलट कार अन् सुरक्षारक्षक सोडून एकटेच निघून ग

पुणे: राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. बैठका, मुलाखती, चर्चा, जागावाटप या घडामोडी घड असतानाच अचानकपणे आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांनाच चक्रावून सोडलं. पुण्यातील बारामती हॉस्टेलमधून अजित पवार कोणालाही काहीही न सांगता, कोणताही सरकारी ताफा किंवा पोलीस संरक्षण न घेता अचानक एकटेच रवाना झाले. त्यामुळे अजित पवार नेमकं कुठे गेले? याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. यावेळी त्यांनी पोलीस संरक्षण, पोलीस ताफा काहीही न घेता एकटे अजित पवार अचानक रवाना झाले. अजित पवार नेमके गेले कुठे? आणि का गेले? असा प्रश्न सर्वांना पडला होता.

नेमकं काय घडलं?

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये नियोजित बैठकांसाठी उपस्थित राहत आहेत. बारामती हॉस्टेमध्येच ते इच्छुकांच्या मुलाखती, बैठका, गाठीभेटी घेत आहेत. मात्र, आज सकाळी अचानक ते इथून एकटेच बाहेर पडले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांच्यासोबत नेहमी असणारा पोलिसांचा फौजफाटा, पायलट कार आणि सुरक्षारक्षक यांचा ताफा तिथेच उभा राहिला. अजित पवार एकटेच तिथून निघून गेले आहेत.

तर मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. दोन्ही राष्ट्रवादीत जागा वाटपाचं सूत्र देखील ठरलं होतं. मात्र, घड्याळ की तुतारी ऐनवेळी कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची, यावरून ही चर्चा फिसकटल्याची माहिती आहेत. ही चर्चा फिसकटल्यानंतर अजित पवार अचानक बारामती हॉस्टेलमधून बाहेर पडले आहेत.  शरद पवार गटाशी चर्चा फिसकटल्यानंतर अचानक अशाप्रकारे अजित पवार एकटेच गेल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. ते कौटुंबीक कारणासाठी तिथून बाहेर पडले की यामागे काही राजकीय कारण आहे? याबाबत आता विविध चर्चांना उधाण आलं आहे.

तर काही वेळानंतर समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पवारांचं वाहन त्यांच्या जिजाई निवासस्थानी दिसून आलं आहे. अजित पवार नेमके जिजाईमध्ये आहेत की नेमके कुठे आहेत असा प्रश्न आहे. बारामती हॉस्टेलमधून अजित पवार चीड चीड करत एकटेच बाहेर पडले होते. त्यानंतर मागून त्यांनी त्यांचा ताफा बोलावून घेतला. त्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार अजित पवार हे त्यांच्या जिजाई निवासस्थानी आले आहेत. त्याचबरोबर जिजाई निवासस्थानी शरद पवारांच्या पक्षाचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

जिजाई निवासस्थानी अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात बैठक झाली. अमोल कोल्हे अजित पवारांच्या जिजाई निवासस्थानातून बाहेर पडले. अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्या जवळपास अर्धा तास चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.