ना पोलीस संरक्षण, ना ताफा, अजित पवार फोनवर बोलत बोलत गाडीतून गेले कुठे? अखेर लोकेशन समोर आलं अन
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील बारामती हॉस्टेल या ठिकाणी बैठका, मुलाखती घेत आहेत. पुणे महानगर पालिका (Pune Municipal Corporation) आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिका (pimpri chinchwad mahanagar palika) निवडणुकीसाठी अजित पवार अॅक्शन मोडमध्ये आले असून ते या ठिकाणावरून सर्व सूत्र हलवताना दिसत आहे. अशातच काल (शुक्रवारी, ता 26) दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडीची चर्चा फिस्कटली असल्याची माहिती समोर आली आहे. कारण अजित पवारांनी शरद पवारा़ंच्या पक्षाला अवघ्या तीस ते पस्तीस जागा देऊ केल्यात आणि घड्याळ या चिन्हावर लढण्याची अट घातली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाचे अंकुश काकडे आणि विशाल तांबे हे काल रात्री झालेल्या महाविकास आघाडीच्या (MVA) बैठकीला हजर होते. त्यामुळे शरद पवारांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुन्हा महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा प्रयत्न करतोय. मात्र अद्याप कोणताही ठाम निर्णय झालेला नाही. अशातच आज सकाळी बारामती हॉस्टेलवरून अजित पवार (Ajit Pawar) अचानक आपला ताफा आणि पोलीस संरक्षण न घेता पुण्यातील बारामती हॉस्टेलमधून बाहेर पडल्याची माहिती समोर आली होती.
आज सकाळी अजित पवार बारामती हॉस्टेलमध्ये आले होते. मात्र अवघ्या काही मिनिटांत ते पोलीस संरक्षण न घेता तिथून एकटेच गाडी घेऊन निघून गेले. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांचं कुठे गेले होते, त्यांचं लोकेशन सापडलं आहे. बारामती हॉस्टेलमधून अजित पवार ज्या कारने बाहेर पडले होते, ती कार अजित पवारांच्या शिवाजीनगर येथील जिजाई निवासस्थानाबाहेर असल्याचं दिसून आलं. अजित पवार पोलीस ताफा न घेता जिजाई निवासस्थानी का गेले? इथं ते कुणाला भेटायला आले? अजित पवारांच्या आधीच जिजाई निवासस्थानी कुणी आलंय का? अशा विविध चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर काही वेळातच त्या ठिकाणीवरून शरद पवारांच्या पक्षाचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांची गाडी बाहेर पडली. पुण्यातील युती फिस्कटल्यानंतर आता पिंपरी चिंचवडमधील युतीबाबत चर्चा करण्यासाठी अजित पवार आणि कोल्हे एकत्र आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Pune News: अजित पवार-अमोल कोल्हेच्या गुप्त बैठकीत कशावर झाली चर्चा
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची आघाडीत बिघाडी झाल्याची चिन्ह निर्माण झाली असली तरी पिंपरी चिंचवडमध्ये मात्र मविआ वगळता फक्त दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायचं का? या अनुषंगाने अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्या आज सकाळी सकाळी झालेल्या गुप्त बैठकीत चर्चा झाली आहे, अशी माहिती खात्रीपूर्वक सूत्रांनी दिली आहे. घडाळ्याचा चिन्हावर लढा, असा प्रस्ताव पिंपरी चिंचवड साठी अजित पवारांनी दिला नसल्यानं चर्चा पुढच्या टप्प्यात येऊन पोहचली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास काँग्रेसने आम्ही या आघाडीत येणार नाही, असा निरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीला काल रात्री दिला. त्यानंतर आज पिंपरी चिंचवड मध्ये मविआ वगळता फक्त दोन राष्ट्रवादी एकत्र यावं का? अशी चर्चा अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात आजच्या गुप्त बैठकीत झाल्याची माहिती आहे. तसेच ज्या दोन जागांवर तिढा होता, तो सोडवण्याची तयारी ही अजित पवारांनी दाखवली आहे. किमान पिंपरी चिंचवड मध्ये दोन्ही पवारांनी एकत्र यायला हवं, त्यामुळं तडजोड करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.