अजित पवार-शरद पवारांची प्रस्तावित आघाडी तुटली, पुण्यात पवार गटाने दादांचा प्रस्ताव फेटाळला!
पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये एकत्रित जाणाऱ्या दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडीची चर्चा काल (शुक्रवारी, ता २६) फिस्कटली. कारण अजित पवारांनी शरद पवारा़ंच्या पक्षाला अवघ्या तीस ते पस्तीस जागा देऊ केल्यात आणि घड्याळ या चिन्हावर लढण्याची अट घातली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाचे अंकुश काकडे (Ankush Kakde) आणि विशाल तांबे (Vishal Tambe) हे काल रात्री झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला हजर होते. त्यामुळे शरद पवारांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुन्हा महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा प्रयत्न करतोय. मात्र अद्याप कोणताही ठाम निर्णय झालेला नाही, अशी माहिती समोर आली होती, अशातच दोन्ही राष्ट्रवादीची पुणे महापालिकेत आघाडी होणार नाही. आम्ही महाविकास आघाडीतून लढणार असल्याची माहिती अंकुश काकडे (Ankush Kakde) यांनी दिली आहे. घडाळ्याच्या चिन्हावर लढण्याचा अजित पवारांचा प्रस्ताव शरद पवारांना अमान्य असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही राष्ट्रवादीचे जागावाटप आणि निवडणूक चिन्हावरून मतभेद झाल्याने काल रात्री चर्चा फिस्कटली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महाविकास आघाडीच्या साथीनेच लढण्याचा निर्णय घेत काँग्रेस आणि उद्धवसेनेशी चर्चा सुरू केली आहे. पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही पक्षांच्या आघाडीसाठी शरद पवार गटाचे नेते माजी महापौर अंकुश काकडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती होस्टेलवर शुक्रवारी रात्री भेट घेतली. त्यावेळी जागावाटप आणि घड्याळ की तुतारी चिन्हावर लढायचे, याविषयी चर्चा झाली. शरद पवार गट तुतारी चिन्हासाठी ठाम होता. केवळ ३५ जागा देण्याचा प्रस्तावही शरद पवार गटाला अमान्य होता. त्यामुळे चर्चा फिस्कटली, अशी माहिती समोर आली आहे.
MVA Pune: महाविकास आघाडीच्या घटक पक्षांशी बैठक
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाशी चर्चा फिस्कटल्यानंतर शरद पवार गटाने तातडीने महाविकास आघाडीच्या घटक पक्षांशी चर्चा सुरू केली आहे. काँग्रेस, उद्धवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या तिन्ही पक्षांची उशिरा रात्री संयुक्त बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे विशाल तांबे, अंकुश काकडे, मनाली भिलारे, अश्विनी कदम आणि आमदार बापू पठारे, तर काँग्रेसकडून अरविंद शिंदे, अभय छाजेड, रमेश बागवे आणि ठाकरेंच्या शिवसेनेते वसंत मोरे, गजानन थरकुडे, संजय मोरे हे उपस्थित होते.
Ajit Pawar and Amol Kolhe Meet: अजित पवार-अमोल कोल्हेच्या बैठकीनंतर पिंपरीतील शरद पवारांचे शहराध्यक्ष म्हणाले…
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या आजच्या बैठकीत, पिंपरी चिंचवडमध्ये मविआ वगळता दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र यावं का? या अनुषंगाने चर्चा झाली का? याची मला कल्पना नाही. पण स्थानिक काँग्रेसने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर आम्ही त्या आघाडीत येणार नाही. असं स्पष्ट केल्याचं शरद पवारांचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी स्पष्ट केलं. पुण्याप्रमाणे आम्हाला घड्याळावर लढण्याचा प्रस्ताव अजित दादांनी दिलेला नाही, ते घड्याळावर आणि आम्ही तुतारीवर लढू. यात कोणताही बदल होणार नाही. असं कामठे ठामपणे म्हणालेत. तसेच आम्ही आज पुन्हा एकदा काँग्रेस आणि मविआच्या घटक पक्षांना अजित दादांसोबत आघाडी करण्याची विनंती करु, असं म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अजित पवारांसोबत आघाडी करण्याचे अप्रत्यक्षपणे संकेत दिलेत. पण याआधी ही असे संकेत अनेकदा दिल्यानं या चर्चेला अंतिम रुप येईल का? याची खात्री कोणालाच नाही.
आणखी वाचा
Comments are closed.