सोलापुरात ऑपरेशन लोटस सुरुच, मोहिते पाटलांचे निकटर्तीय बाबाराजे देशमुख भाजपच्या गळाला
सोलापूर : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे (Mahapalika Election) बिगुल वाजलं आहे. येत्या 15 जानेवारीला महापालिका निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन लोटस सुरूच असल्याचे दिसत आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे निकटवर्तीय बाबाराजे देशमुख यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बाबाराजे देशमुख यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भूषवले आहे.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे निकटवर्तीय बाबाराजे देशमुख यांनी आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माळशिरस तालुक्यात आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या दृष्टीने भाजपची ताकद वाढली आहे. बाबाराजे देशमुखांच्या भाजप प्रवेशाने मोहिते पाटील गटाला मोठा धक्का बसला आहे.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोहिते पाटील कुटुंबातील अनेक मातब्बर नेत्यांना पक्षात घेऊन मोठा राजकीय धक्का दिला आहे. जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बाबाराजे देशमुख, माने पाटील व देशमुख कुटुंबातील अनेक सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षांतरामुळे माळशिरस तालुक्यासह आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. नगरपालिका निवडणुकीनंतर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही भाजपने मोहिते पाटील यांना वगळून निवडणुका लढविण्याचे ठरविले असल्याचे दिसून येत आहे. यासोबतच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे मावस भाऊ तथा सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील, त्यांचे चुलत बंधू हिंदुराव माने पाटील, सुजय माने पाटील, यांच्यासोबत माजी आमदार बाबूराव देशमुख यांचे चिरंजीव पांडुरंगभाऊ देशमुख, धनंजय देशमुख व वेळापूर, अकलूज परिसरातील माने पाटील, देशमुख कुटुंबीयांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या भाजपमध्ये आज झालेल्या पक्ष प्रवेशामुळं मोहिते पाटलांना मोठा धक्का बसला आहे. या पक्ष प्रवेशामुळं माळशिरस तालुक्यात भाजपची ताकद वाढणार आहे. पुढच्या काही दिवसातच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत. या दृष्टीने आज झालले पक्ष प्रवेश हे महत्वाचे मानले जात आहेत.
महत्वाच्या बातम्या:
काँग्रेससच्या माजी मंत्र्यांचा मुलगा भाजपात; प्रशांत जगतापांविरुद्ध निवडणूक लढवणार, पुण्यात भाजपची खेळी
आणखी वाचा
Comments are closed.