बीडमध्ये गुंडाराज, टोळक्याने बंदुकीच्या मुठीने व्यापाऱ्याचं डोकं फोडलं, नेकनूरमध्ये दोन गटात हा

बीड गुन्हे: बीडमध्ये मारहाण आणि दहशतीच्या घटना काही केल्या संपत नाहीत. किरकोळ वादातून मोठा जमाव येतो आणि लाठ्या काठ्या, लोखंडी सळ्या कहार शस्त्राने जीवघेणा हल्ला करतो, अशा घटना बीडमध्ये रोजच्या झाल्या आहेत. काल रात्री (27 डिसेंबर) बीडमध्ये दोन गंभीर मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. बीड शहरात 6 ते 7 जणांच्या टोळक्याने सुभाष हुंबिरे नामक व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली. हल्लेखोरांनी बंदुकीच्या मुठीने व्यापाऱ्याचे डोके फोडले. तर दुसऱ्या घटनेत बीडचा नेकनूरमध्ये हातात लाकडी दांडके घेऊन भर रस्त्यात हाणामारी करत दहशत माजवण्याचा प्रकार घडला. दोन्ही गटातील जखमींवर उपचार सुरू आहेत. या दोन्ही घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून अशा पद्धतीने दहशत निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे. (Beed Crime)

बंदुकीच्या मुठीने व्यापाऱ्याचा डोकं फोडलं

बीडमध्ये मारहाण दहशतीच्या घटना सुरूच आहेत. काल रात्री बीड शहरात 6 ते 7 जणांच्या टोळक्याने सुभाष हुंबरे नामक व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली. या हल्ल्यात हुंबरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील अंबिका चौक परिसरात असलेल्या तुळजाई ट्रेडिंग कंपनी कार्यालयात सुभाष हुंबरे बसले असताना अचानक सहा ते सात जणांनी कार्यालयात घुसून त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी बंदुकीच्या मुठीने मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर घटनास्थळी पोलिसांना हल्लेखोरांकडे असलेली एक बंदूक आढळून आली. या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे

हातात लाकडी दांडके, भर रस्त्यात हाणामारी

बीडच्या नेकनूर येथे भर रस्त्यावर दोन गटात हाणामाऱ्या झाल्या यामध्ये दोन्ही गटातील काही लोक जखमी झाले. यामुळे नेकनूर गावामध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.. दरम्यान ही मारामारी सुरू होण्यापूर्वी हातात लाकडी दांडके व इतर वस्तू घेऊन जाताना काही लोक दिसत आहेत. असा व्हिडिओ समोर आला असून अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही.. परंतु या घटनेमुळे नेकनूर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.. अशा पद्धतीने भर रस्त्यावर मारहाण करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

आणखी वाचा

Comments are closed.