आधी पार्टी नंतर उशीनं तोंड दाबून संपवलं, 50 तोळं सोनं गायब, महापालिकेसाठी तयारी करणाऱ्या तृतीयप
सोलापूर : राज्यभरात महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच दुसरीकडे सोलापूर शहरात एका तृतीयपंथीयाचा निर्घृणपणे खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या खूनाच्या (Solapur Crime News) घटनेनं खळबळ उडाली आहे. सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या आणि महानगरपालिकेची तयारी करत असलेल्या भावी नगरसेवकाचा खूनाच्या घटनेनं (Solapur Crime News) खळबळ उडाली आहे. अय्युब हुसेन सय्यद (वय ५० रा. उत्तर सदर बझार, सोलापूर) असं मृत तृतीयपंथीयाचं नाव आहे. अय्युब सय्यद हे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार होते. त्यांनी प्रभाग 16 मधून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती, मात्र त्यापूर्वीच त्यांचा खून (Solapur Crime News) झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवरती देखील ते पालिकेसाठी तयारी करत असल्याचे व्हिडीओ शेअर करण्यात आलेले होते.(Solapur Crime News)
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर सदर बझार येथील एका तृतीयपंथीचा तोंडावर उशीने दाबून खून करण्यात आला. ही घटना काल (शनिवारी ता, २७) दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली आहे. अय्युब हुसेन सय्यद (वय ५० रा. उत्तर सदर बझार, सोलापूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला. हा खून का केला याचे कारण अस्पष्ट आहे. सय्यद हे शुक्रवारी झोपण्यासाठी राहत्या घरातील वरच्या मजल्यावर गेले होते. सकाळी उठले नाहीत. दुपारीही खाली आलेले नाहीत. त्यानंतर त्यांची काळजी घेणाऱ्या महिलेच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता, बेडवर बेशुद्धावस्थेत पडलेले होते. तोंडावर उशी होती. त्या महिलेने पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला, आणि घटनेचा तपासही पोलिसांनी सुरू केला आहे.
Solapur Crime News : दारू पार्टी झाल्यानंतर मित्र गाडी घेऊन पसार
अय्युब सय्यद हे मित्रांसमवेत शुक्रवारी रात्री घराच्या वरच्या मजल्यावर गेले होते. त्यांनी दारू पार्टी केली, अशी माहिती तेथील नागरिकांनी दिली. त्यांच्या घरासमोर दोन सीसीटीव्ही कॅमेरे दिसले. घरात डीव्हीआर नाही. मध्यरात्रीनंतर तिघेजण अय्युब यांच्याच दुचाकीवरून पसार झाल्याचे इतर सीसीटीव्हीमध्ये पोलिसांना दिसून आले आहे. सीसीटीव्ही तपासून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
सय्यद यांचे समाजामध्ये चांगले नाव होते. ते सोशल मिडीयावरतीही चांगलेच अँक्टीव्ह होते, ते भिशी चालवत होते. त्यांच्या राहत्या घरातील एका प्लास्टिकच्या डब्यात काही चिठ्ठया मिळाल्या. घरात इतर कोणी राहत नाही. नातेवाईक नई जिंदगी परिसरात राहतात. त्यांच्याकडे किमान ४० ते ५० तोळे सोने आहे. महापालिका निवडणुकीत प्रभाग १६ मधून ते इच्छुक असल्याची चर्चाही होती. तर या घटनेनंतर आजूबाजूच्या नागरिकांनी माहिती देताना सांगितलं की, अयुब सय्यद यांच्याकडे लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने होते. हत्या करणाऱ्यांनी सर्व सोने लंपास केले आहेत. हत्या करणाऱ्यांनी कानातील सोने ओरबाडून कान फाडून घेऊन गेले आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.