इतक्यात कामाला लागू नका नाही तर थेट दवाखान्यात जावं लागेल; आमदार सुरेश धस यांचा मिश्किल सल्ला
बीड वार्ता: बीड जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका (Beed Zilla Parishad and Panchayat Samiti Elections) आता थेट एप्रिल महिन्यात गेल्या असल्यानं आम्ही सध्या मोकळेच आहोत. आमच्या तयारीला लागलेल्या लोकांचे कंबरडे मोडले. जे अती तयारीला लागले त्यांनी हळूहळू तयारी करा. इतक्या लवकर कामाला लागू नका, नाही तर दवाखान्यात जावे लागेल, असा सल्ला भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी कार्यकर्त्यांना दिलाय. त्यांच्या या मिश्किल सल्ल्यानं उपस्थितताममध्ये एकच हशा पिकलाहे. आष्टी येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना धस (Suresh Dhas) यांनी कार्यकर्त्यांना हा सल्ला दिलाहे.
दरम्यान, यावेळी बोलताना आमदार सुरेश धस यांनी कृषी सहाय्यकांबाबत शेतकऱ्यांच्या सर्वाधिक तक्रारी असल्याचे सांगितलंहे. ज्या अधिकाऱ्यांच्या जास्त तक्रारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्या वाहनांना जीपीएस लावण्याच्या सूचनाहे धस यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
बीड न्यूज : बीडच्या कडा येथील महेश सहकारी साखर कारखाना परिसरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा पहिला मेळावा
बीडच्या आष्टीतील कडा येथील महेश सहकारी साखर कारखान्याचा परवाना पूर्ववत झाल्यानंतर नुकताच पहिला ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा पार पडला. साखर कारखान्याच्या परवान्यावरून आमदार सुरेश धस आणि माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला होता. मात्र धोंडे यांच्या पाठपुराव्यानंतर साखर कारखान्याचा परवाना पूर्ववत झाला आहे. नुकताच याच कारखाना परिसरात आधुनिक ऊस लागवडीचे तंत्र यावर चर्चासत्र भरविण्यात आले. कारखान्याचा परवानापूर्वक झाल्यानंतर लवकरच हा कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुरू केला जाणार आहे. दरम्यान कृष्णा खोऱ्यातील पाच टीएमसी पाणी आष्टी तालुक्यासाठी मिळणार असल्याने या परिसरात एकही गुंठा क्षेत्र कोरडवाहू राहणार नाही असा विश्वास धोंडे यांनी यावेळी व्यक्त केला.
Beed Crime : बीडमध्ये व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
बीडमध्ये मारहाण दहशतीच्या घटना सुरूच आहेत. काल रात्री बीड शहरात सहा ते सात जणांच्या टोळक्याने सुभाष हुंबरे नामक व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली. या हल्ल्यात हुंबरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील अंबिका चौक परिसरात असलेल्या तुळजाई ट्रेडिंग कंपनी कार्यालयात सुभाष हुंबरे बसले असताना अचानक सहा ते सात जणांनी कार्यालयात घुसून त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी बंदुकीच्या मुठीने मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर घटनास्थळी पोलिसांना हल्लेखोरांकडे असलेली एक बंदूक आढळून आली. या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.