पुणे विमानतळाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची पहाटे मोठी कारवाई; 50 जणांना घेतलं ताब्यात, नेमकं
पुणे: पुण्यातील विमाननगर परिसरात बेकायदा सुरू असलेल्या पार्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी पहाटे मोठी कारवाई (Pune Crime News) केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने हॉटेल ‘द नॉयर’ पब येथे छापा टाकत महिला आणि पुरुष अशा एकूण ५० जणांना ताब्यात (Pune Crime News) घेतले आहे. या प्रकरणी पब मालक अमरजित सिंग संयु याच्यासह १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अधीक्षक अतुल कानडे आणि त्यांच्या पथकाने केली असून, यामधून ३ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.(Pune Crime News)
विमाननगर परिसरात कोणताही परवाना न घेता पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने ही धडक कारवाई केली आहे. छाप्यात १७८ विदेशी मद्याच्या बाटल्या सापडल्या आहेत. यासोबतच अवैध मद्य व्यवसायासाठी वापरले जाणारेखुर्च्या, सोफा, लाकडी टी-पॉय, स्पीकर्स, साऊंड सिस्टिम, लॅपटॉप, संगणक, काचेचे ग्लास, फॉग मशीन यासह इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
Pune Crime News: राज्य उत्पादन शुल्क विभागाची २१ भरारी पथके तैनात
या प्रकरणात एकूण ५२ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून, यातील पब चालक आणि व्यवस्थापक असे दोन आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असून त्यांना फरार घोषित करण्यात आले आहे. दरम्यान, नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात होणाऱ्या बेकायदा पार्ट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची २१ भरारी पथके तैनात करण्यात आली असल्याची माहिती अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली आहे.
Pune Crime News: सार्वजनिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी तपासणी मोहिमा
या कारवाईनंतर शहरातील हॉटेल्स, पब आणि पार्टी आयोजकांमध्ये खळबळ उडाली आहे. कोणताही परवाना न घेता मद्यविक्री आणि ध्वनीप्रदूषण करत पार्ट्या आयोजित केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे. विशेषतः नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था आणि सार्वजनिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी तपासणी मोहिमा अधिक तीव्र केल्या जाणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
Pune Crime News: कोणताही परवाना न घेता पार्टी सुरू
विमाननगर परिसरात कोणताही परवाना न घेता पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने ही धडक कारवाई केली. छाप्यात १७८ विदेशी मद्याच्या बाटल्या सापडल्या. यासोबतच अवैध मद्य व्यवसायासाठी वापरले जाणारे खुर्च्या, सोफा, लाकडी टी-पॉय, स्पीकर्स, साऊंड सिस्टिम, लॅपटॉप, संगणक, काचेचे ग्लास, फॉग मशीन यासह इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात एकूण ५२ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून, यातील पब चालक आणि व्यवस्थापक असे दोन आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असून त्यांना फरार घोषित करण्यात आले आहे.
आणखी वाचा
Comments are closed.