BMC Election 2026: भाजपचा मुंबईतील पहिला उमेदवार ठरला? व्हिडीओ व्हायरल, पहिला मोहरा कोण?

BMC निवडणूक 2026: आगामी मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर आता कोणत्याही क्षणी महायुती आणि ठाकरे बंधूंकडून उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमधील इच्छूक उमेदवार अंतिम यादीकडे आणि एबी फॉर्मकडे डोळे लावून बसले आहेत. भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुंबईत (Mumbai news) एकत्र निवडणूक लढवणार आहेत. या दोघांनी जागावाटपाचे सूत्र जवळपास निश्चित केले असले तरी भाजपने (BJP) अद्याप मुंबईतील एकाही उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळे भाजपच्या मुंबईतील पहिल्या संभाव्य उमेदवाराचे नाव समोर आले आहे.

काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या तेजस्वी घोसाळकर (Tejasavee Ghosalkar) यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ दहिसर (Dahisar news) भागातील आहे. महिलांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेच्या या कार्यक्रमात आपल्याला तेजस्वी घोसाळकर यांना निवडून द्यायचे आहे, असे एक महिला सांगताना दिसत आहे. त्यावर टाळ्यांचा कडकडाट होताना दिसत आहे. विशेष म्हणजे तेजस्वी घोसाळकर यांनी हा व्हिडीओ शेअर करुन ‘दहिसर प्रभाग क्रमांक 2’, असे लिहले आहे. हा विश्वास व टाळ्यांच्या कडकडाटाने आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाली. दहिसरच्या न्याय आणि प्रगतीसाठीच्या माझ्या निर्धाराला माझ्या या मैत्रिणींचं, बहिणींचं आणि माता-भगिनींचं बळ मिळत आहे, याबद्दल मी कायम या सर्वांच्या ऋणात राहीन, असे कॅप्शन त्यांनी या व्हिडीओत लिहले आहे. त्यामुळे तेजस्वी घोसाळकर या दहिसरच्या प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपच्या उमेदवार असतील, हे आता जवळपास निश्चित आहे.

तेजस्वी घोसाळकर यांचे सासरे विनोद घोसाळकर हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. अनेक वर्षांपासून विनोद घोसाळकर आणि त्यांचा मुलगा अभिषेक घोसाळकर हे शिवसेनेत होते. अभिषेक घोसाळकर हे मुंबई बँकेचे संचालक होते. माजी नगरसेवक असलेल्या अभिषेक घोसाळकर यांची 2024 मध्ये मॉरिस नावाच्या व्यक्तीने हत्या केली होती. तर 2017 मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत तेजस्वी घोसाळकर शिवसेना ठाकरे गटाकडून प्रभाग क्रमांक 1 मधून  विजयी झाल्या होत्या. त्यांनी ठाकरे यांची इतक्या वर्षांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हाच त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तेजस्वी घोसाळकर या त्यांचा प्रभाग क्रमांक 2 पिंजून काढत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये भाजपकडून अधिकृतरित्या त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा

मोठी बातमी! मुंबईसाठी भाजप महायुतीचं ठरलं, शिंदेंच्या शिवसेनेला 79 जागा; 20 जागांसाठी वेगळाच फॉर्म्युला

आणखी वाचा

Comments are closed.