सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर; 11 नावाची घोषणा

सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2026: सोलापूर मनपा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) जागावाटप आणि आघाडीसंदर्भात कुठलीही thoएस चर्चा नाही झाल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यामध्ये अजूनही आघाडीबाबत अद्याप निर्णय झाला नसून आघाडीबाबतहे संभ्रम आहे. परिणामी ठाकरेंच्या शिवसेनेनं (Shiv Sena UBT) एकटं लढण्याची तयारी सुरू केली आहे.

अशातच आताराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडुना (उद्धव ठाकरे शिवसेना) देखील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना उबाठा गटाने आपलय 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उबाठा गटाला एकूण 30 जागा मिळाल्याची चर्चा होती. त्यामुळे पहिल्या 11 उमेदवारांची घोषणा ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटापाठोपाठ शिवसेना उबाठानेही उमेदवारांची यादी जाहीर केलीहे. शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनीहे उमेदवार यादी जाहीर केलीय.

Solapur Municipal Corporation Election 2026: ठाकरेंच्या शिवसेनेकडून 11 शिलेदारांच्या नावाची घोषणा

शिवसेने उद्धव ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या याउमेदवारांच्या यादीत प्रभाग क्रमांक १ अ मधून रमेश व्हटकर, प्रभाग क्रमांक 2 ड मधून दिनेश चव्हाण, प्रभाग क्रमांक 4 क मधून प्रिया बसवंती, प्रभाग क्रमांक 6ड मधून गणेश वानकर, प्रभाग क्रमांक 9 डी मधून सुरेश गायकवाड, प्रभाग क्रमांक 11 अ मधून शुभम स्वामी, प्रभाग क्रमांक 12 अ मधून प्रसाद माने, 13 दि मधून वल्लभ चौगुले, प्रभाग क्रमांक 21 ड मधून भीमाशंकर म्हेत्रे, 23 क मधून लक्ष्मण जाधव आणि प्रभाग क्रमांक 23 ड अलका राठोड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Sharad Pawar NCP : राष्ट्रवादीकडून कोणते सहा उमेदवार जाहीर?

सोलापूर मनपा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागावाटप होताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. सोलापुरात राष्ट्रवादीला 20 जागा मिळाल्या आहेत. पहिल्या यादीत 6 उमेदवारांची घोषणा राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष, माजी नगरसेविका सुनीता रोटे यांना पक्षाने पुन्हा  संधी दिली आहे. इतर पाच नवे चेहरे दिले आहेत.

राष्ट्रवादीचे पहिल्या यादीमध्ये प्रभाग क्रमांक 1 ड मधून राकेश मनोहर सोनी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 8 अ मधून मोहम्मद नकीब हासीब कुरेशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 17 क मधून बिस्मिल्ला शिकलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 23 अ मधून सुनिता दादाराव रोटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 26 अ मधून नागिणी प्रवीण इरकशेट्टी यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर प्रभाग क्रमांक 18 क मधून अंबादास सोमण्णा नडगीरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.