नागपुरात मविआचे तिन्ही पक्ष एकत्र लढण्यावर एकमत; काँग्रेसला झुकतं माप, तर शिवसेनेला अवघ्या…
नागपूर: राज्यातील महापालिका (Mahapalika) निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांमध्ये जोरदार घडामोडी घडत असल्याचे चित्र आहे. तर नेतेमंडळींसह कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांच्याहे अनेक तऱ्हा सर्वसामान्य नागरिकांना पाहायला मिळत आहेत. राज्यातील बहुतांश मतदारसंघातीला जागावाटपाचा निर्णय शेवटचा टप्प्यात असल्याचे बोललं जात आहे. अशातच आता नागपूरमध्येहे महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) तिन्ही पक्ष एकत्र लढण्यावर जवळपास एकमत झाल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस 129, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) 12 आणि ठाकरेंच्या शिवसेनेला 10 जागाया सूत्रावर तिन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी होकार दर्शवला असल्याची माहिती आहे.
मात्र, या संदर्भात अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसल्याचीहे माहिती आहे. त्यामुळे सत्तेत असलेल्या भाजप आणि महायुतीला रोखण्यासाठी मावीया काय रणनीती शिकार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे(नागपूर महानगरपालिका निवडणूक 2025)
महायुतीची जागावाटप : भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं sooत्यामुळे जुळलं, अजित दादांच्या राष्ट्रवादीला दावललं?
दुसरीकडेनागपूर महानगर पालिका निवडणुकीत युती किवा आघाडीचे अजून चित्र स्पस्ट नाही. मात्र भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या युतीची सकारात्मक चर्चा शेवटचा टप्प्यात असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित कालावधी झालेल्या बैठकीत संपूर्ण 151 जागेवर उमेदवारांची नावे निश्चित झाली. यात शिवसेनेच्या वाट्यात जाणाऱ्या जागेवर शिवसेनेनाही दिलेल्या नावांवरहे चर्चा झाली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसला अजून चर्चेला पण बोलवले नसल्याने राष्ट्रवादी युतीत असण्याची शक्यात नाममात्र दिसत आहे.
Ajit Pawar NCP : महायुतीत सन्मानजनक जागा नाही मिळाल्यास वंचितसोबत युती?
अशातच, नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला युतीसाठी विचारलं जात नसल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसने वंचित सोबत चर्चा सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व वंचित यांची बोलणी साकारातमक टप्प्यावर असून जागावाटपावर आज परत चर्चा होणार आहे. त्यामुळे महायुतीत सन्मानजनक जागा नाही मिळाल्यास नागपुरात राष्ट्रवादी आणि वंचित या पक्षाची युती होण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशनपत्र स्वीकारणे: 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025
नामनिर्देशनपत्रांची छाननी: 31 डिसेंबर 2025
उमेदवारी माघारीची अंतिम मुदत : 02 जानेवारी 2026
निवडणूक चिन्ह वाटप : 03 जानेवारी 2026
अंतिम उमेदवारांची यादी- 03 जानेवारी 2026
मतदानाचा दिनांक : 15 जानेवारी 2026
मतमोजणीचा दिनांक : 16 जानेवारी 2026
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा
Comments are closed.