3 ओव्हर, 4 विकेट्स… शार्दूल ठाकूरचा कहर! टीम इंडियाचं दार पुन्हा ठोठावले, न्यूझीलंडविरुद्धच्य

मुंबई विरुद्ध छत्तीसगड विजय हजारे ट्रॉफी : विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धेतील तिसऱ्या फेरीचे सामने आज सोमवार 29 डिसेंबर रोजी देशभरात सुरू असून अनेक मोठ्या घडामोडींनी क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. जयपूरमधील जयपुरिया विद्यालय मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात मुंबई संघाने चंदीगडविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात मुंबईचा अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार शार्दुल ठाकूरने छत्तीसगडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. शार्दुल ठाकूर घातक फॉर्ममध्ये दिसला आणि त्याने अवघ्या 5 षटकांत केवळ 13 धावा देत 4 महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. त्याच्या माऱ्यामुळे छत्तीसगड संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली.

शार्दुल ठाकूरने छत्तीसगडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले

छत्तीसगडने पहिल्या 10 षटकांतच 4 विकेट्स गमावत केवळ 34 धावा केल्या असून संघावर मोठे संकट ओढावले आहे. शार्दुलच्या या झंझावाती गोलंदाजीमुळे मुंबई संघ सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवताना दिसत आहे. विजय हजारे ट्रॉफीतील पुढील सामन्यांमध्येही अशाच थरारक लढती पाहायला मिळण्याची अपेक्षा क्रिकेट चाहत्यांना आहे.

शार्दुल ठाकूरला न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेत संधी मिळणार?

हा प्रश्न सध्या क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चेत आहे. विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये शार्दुल ठाकूरने पुन्हा एकदा सिद्ध केले आहेत आणि टीम इंडियाचं दार पुन्हा ठोठावले आहे. न्यूझीलंडविरुद्ध येणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी BCCI काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत अष्टपैलू गोलंदाज म्हणून शार्दुल ठाकूर हा एक मजबूत पर्याय ठरू शकतो. याशिवाय 2027 वनडे वर्ल्ड कपच्या दृष्टीने BCCI बेंच स्ट्रेंथ मजबूत करण्यावर भर देत आहे. विजय हजारेसारख्या देशांतर्गत स्पर्धांतील कामगिरीला पुन्हा महत्त्व दिलं जात असल्याने शार्दुलसारख्या खेळाडूंसाठी ही मोठी संधी आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा आज खेळणार नाहीत…

मात्र, आजच्या सामन्यांमध्ये चाहत्यांना विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोन दिग्गज खेळाडू मैदानात दिसणार नाहीत, ही बाब थोडी निराशाजनक ठरली. रोहित शर्मा स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी उपलब्ध होता, तर विराट कोहली दिल्ली संघात 6 जानेवारी रोजी रेल्वेविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी संघात सामील होणार आहे. हे दोन्ही स्टार खेळाडू 11 डिसेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज होत असल्याने त्यांना विश्रांती देण्यात आली आहे.

मुंबई संघाची प्लेइंग इलेव्हन : अंगकृष्ण रघुवंशी, मुशीर खान, सरफराज खान, सिद्धेश लाड, हार्दिक तामोरे (यष्टीकर), शम्स मुलाणी, इशान मुलचंदानी, इशान मुलचंदानी, तनुस कोटियन, तशार देशपांडे, उद्दिष्टे.

छत्तीसगड संघाची प्लेइंग इलेव्हन : अनुज तिवारी, आशुतोष सिंग, मयंक वर्मा (यष्टिरक्षक), संजीत देसाई, अमनदीप खरे (कर्नाधर), अजय जाधव मंडल, मोहित राऊत, हर्ष यादव, आदित्य सरवटे, रवी किरण, सौरभ मजुमदार.

आणखी वाचा

Comments are closed.