ठाण्यातील मनसेच्या 14 उमेदवारांची नावं ठरली, भाजप-शिंदे गटाला टक्कर द्यायला कोण रिंगणात?

ठाणे महानगरपालिका निवडणूक 2026: ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना सर्वच राजकीय पक्षांकडून आपापल्या उमेदवारांना एबी फॉर्म (AB Form) वाटण्यासाठी लगबग सुरु आहे. ठाण्यात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आणि मनसे (MNS) एकत्रितरित्या निवडणूक लढवत आहेत. मात्र, ठाण्यातील या आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला (Seat Sharing Formula) अद्याप निश्चित झालेला नाही. तरीही मनसेने त्यांच्या निश्चित झालेल्या 24 जागांवरील उमेदवारांना रविवारी रात्री एबी फॉर्म दिल्याची माहिती आहे. या उमेदवारांना त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यापैकी सात उमेदवारांची नावं समोर आली आहेत. (Thane Election 2026 Candidates list)

ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेकडून रविवारी रात्री उशिरा मनसेचे नैनेश पाटणकर – ठाणे पालघर जिल्हा सचिव यांच्याकडून उमेदवारांना एबी फॉर्मच वाटण्यात आले. ठाण्यात मनसे आणि ठाकरे गटाची चांगली ताकद आहे. त्यामुळे या निवडणुकीत ब्रँड ठाकरे भाजप आणि शिंदे गटाला शह देण्यात यशस्वी ठरणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेने अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. आतापर्यंत 24 जणांची उमेदवारी निश्चित झाल्याचे मानले जात आहे. तर आणखी 10 ते 12 उमेदवारांना आज एबी फॉर्म दिले जातील, अशी माहिती मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिली.

Thane MNS Candidates: ठाण्यातील मनसेचे उमेदवार

रवींद्र मोरे – प्रभाग क्रमांक 2
निलेश चव्हाण- प्रभाग क्रमांक 3
पुष्कर विचारे – प्रभाग क्रमांक 5
सचिन कुरेल- प्रभाग  क्रमांक 8
सविता मनोहर चव्हाण – प्रभाग क्रमांक 20
संगीता जोशी- प्रभाग क्रमांक- 21
रश्मी सावंत प्रभाग क्रमांक – 16

Thane Election Result 2017: ठाणे महानगरपालिकेच्या 2017 सालच्या निवडणुकीचा निकाल

ठाणे महानगरपालिकेच्या 2017 साली झालेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकमेकांविरोधात लढले होते. त्यावेळी शिवसेना एकसंध होती. या निवडणुकीत शिवसेनेने ठाणे महानगरपालिकेच्या 67 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती. तर अखंड राष्ट्रवादी काँग्रेसने 34 जागा जिंकल्या होत्या. तर भाजप पक्ष 23 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला होता.

ठाणे महानगपालिका 2026 साठी निवडणूक कार्यक्रम- (Thane Election Date 2026)

  1. नामनिर्देशन- 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
  2. नामनिर्देशन पत्राची छाननी- 31 डिसेंबर
  3. उमेदवार मागे घेणे- 2 जानेवारी 2026 पर्यंत
  4. अंतिम यादी आणि चिन्ह- 3 जानेवारी 2026
  5. मतदान- 15 जानेवारी 2026
  6. मतमोजणी/निकाल-16 जानेवारी 2026

आणखी वाचा

मुंबई महापालिकेसाठी भाजपाची 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!

मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची 42 जणांची यादी; सुतार, वाडकर, फणसे, सावंत…कोणाकोणाला संधी?

आणखी वाचा

Comments are closed.