रिव्हर्स गिअरमधील भरधाव बस गर्दीत शिरली, चाकाखाली चिरडून 4 जणांचा मृत्यू, भांडूप अपघाताचे हादरव

मुंबई : भांडुप (पश्चिम) भागात काल (सोमवारी, ता २९) रात्री एक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्टेशन रोड परिसरात धावणाऱ्या BEST बसने रस्त्यावर चालणाऱ्या (Bhandup Bus Accident) पाच ते सहा जणांना धडक दिली. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले झाल्याची माहिती समोर आली होती. ही घटना रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता.(Bhandup Bus Accident)

मिळालेल्या माहितीनुसार, काल (सोमवारी) रात्री एका बेस्टच्या भाडेतत्वावरील इलेक्ट्रिक बसने १३ निरपराध नागरिकांना चिरडलं. भांडुप पश्चिमेला रात्री १०च्या सुमारास घडलेल्या या भीषण दुर्घटनेमध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे तर १० जण जखमी झाले होते. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असून एकाला रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.(Bhandup Bus Accident)

भांडुप पश्चिम स्टेशन रोड या गजबजलेल्या परिसरात बेस्टची आकाराने मोठी असलेली इलेक्ट्रिक बस मागे घेताना चालकाचा ताबा सुटला आणि बसखाली १३ जण चिरडले. त्यांपैकी चौघांचा जागीच मृत्यू झाला. “या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून १० जणांवर उपचार सुरू होते”, अशी माहिती पोलिस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत यांनी दिली होती. घटनेनंतर तातडीने पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन तपास सुरु केला आहे.

Bhandup Bus Accident: कसा घडला अपघात?

भांडुप पश्चिम स्टेशन रोड या वर्दळीच्या ठिकाणी बेस्टची आकाराने मोठी असलेली इलेक्ट्रिक बस मागे घेताना चालकाचा ताबा सुटला आणि बसखाली १३ जण चिरडले. त्यांपैकी चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले, त्यातील एकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर ९ जणांवरती उपचार सुरू आहेत.

Bhandup Bus Accident: बेस्ट बस अपघातातील मृतांची व जखमींची माहिती

राजावाडी हॉस्पिटल: डॉ तारीख, सीएमओ यांनी माहिती दिली

1. प्रणिता संदिप रासम, मृत घोषित

2. प्रशांत दत्ताराम लाड, डिस्चार्ज

एम टी अग्रवाल: डॉ गायत्री पाटील, एएमओ द्वारे माहिती
मृत
1. वर्षा सावंत, मृत घोषित
2. मानसी मेघश्याम गुरव, मृत घोषित
3. प्रशांत शिंदे, AMO डॉ. गायत्री पाटील यांनी मृत आणले

प्रकृती स्थिर आहे
1. नारायण भिकाजी कांबळे
2. मंगेश मुकुंद धुखंडे
३. ज्योती विष्णू शिर्के

सायन हॉस्पिटल: डॉ रणधीर सिंग, AMO द्वारे माहिती
१.शीतल प्रकाश हाडवे, अल्पवयीन जखमी, प्रकृती स्थिर.

२. रामदास शंकर रूपे, किरकोळ जखमी, प्रकृती स्थिर.

फोर्टिस हॉस्पिटल: कर्मचारी परिचारिकेकडून माहिती नोंदवली

1. प्रताप गोपाळ कोरपे, प्रकृती स्थिर आहे

हिरा मोंगी हॉस्पिटल मुलुंड (प्रा.वि.): डॉ. साक्षी, सीएमओकडून माहिती नोंदवली

१. रवींद्रा सेवाराम घाडीगावकर, प्रकृती स्थिर

मिनाझ हॉस्पिटल, भांडुप (प्रा.वि.): डॉ. सुभाष भाटियाकडून माहिती नोंदवली

१. दिनेश विनायक सावंत, प्रकृती स्थिर
2. पूर्वा संदीप रासम, प्रकृती स्थिर

Bhandup Bus Accident:  भांडुप बस अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर

भांडुप बस अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. फुटेजमध्ये काही प्रवासी रस्त्याच्या कडेला उभे असल्याचे दिसत आहे, जेव्हा अचानक बस मागे येऊ लागते तेव्हा लोक जीव वाचवण्यासाठी पळू लागतात. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बसच्या चाकाखाली एक जण चिरडल्याचे दिसत आहे.अपघात स्थळाजवळील एका कपड्यांच्या दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.