मुंबई इंडियन्सचा मास्टरस्ट्रोक! नव्या हंगामाआधी ऑस्ट्रेलियन स्टार खेळाडूशी डील, दिली मोठी जबाबद

क्रिस्टन बीम्स WPL 2026 मध्ये मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महिला प्रीमियर लीग 2026 सुरू होण्यापूर्वीच गतविजेता मुंबई इंडियन्सने मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील या संघाने आपल्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा बदल करत ऑस्ट्रेलियाची माजी लेगस्पिनर क्रिस्टन बीम्सची स्पिन बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती केली आहे. मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली असून, त्यासोबत क्रिस्टन बीम्सचा एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने मुंबई इंडियन्ससोबत काम करण्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये क्रिस्टन म्हणाली की, “मी इथे पहिल्यांदाच कोच म्हणून आले आहे. झूलन गोस्वामीसारख्या दिग्गज खेळाडूसोबत काम करण्याची संधी मिळणं हे माझ्यासाठी खूपच खास आहे. मी तिच्या विरुद्ध क्रिकेट खेळले आहे आणि आता तिच्यासोबत काम करणं हे अद्भुत आहे.”

ती पुढे म्हणाली की, “मुंबई इंडियन्सने खूप काळापासून जिंकण्याची सवय लावली आहे. या संघातील खेळाडू एकमेकांशी किती जोडलेले आहेत, याबद्दल सतत ऐकायला मिळतं. हा एक कुटुंबासारखा संघ आहे. अशाच कुटुंबाचा भाग व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. कोच म्हणून तुम्हालाही अशाच मजबूत आणि जिंकण्याची मानसिकता असलेल्या वातावरणात काम करायचं असतं.”

अनुभवी कोचिंग स्टाफमध्ये नवी ताकद

क्रिस्टन बीम्स मुंबई इंडियन्सच्या आधीच मजबूत असलेल्या कोचिंग सेटअपमध्ये मोलाचा अनुभव घेऊन आल्या आहेत. संघाचे हेड कोच लिसा केइटली, बॉलिंग कोच व मेंटर झूलन गोस्वामी, बॅटिंग कोच देविका पलशिकर आणि फिल्डिंग कोच निकोल बोल्टन यांच्यासोबत आता क्रिस्टन बीम्सही कार्यरत असणार आहेत. खेळाडू म्हणून पाहिलं तर क्रिस्टन बीम्स हिने ऑस्ट्रेलियाकडून 30 वनडे सामन्यांत 22.45 च्या सरासरीने 42 विकेट आणि 18 टी20 सामन्यांत 20 विकेट घेतल्या आहेत. तिने 1 कसोटी सामनाही खेळला असून, विमेन्स बिग बॅश लीगच्या 45 सामन्यांत 24.08 च्या सरासरीने 37 विकेट तिच्या नावावर आहेत.

तिसऱ्या ट्रॉफीकडे मुंबईची वाटचाल

दोन वेळा विजेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्सचा संघ 9 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या WPL 2026 मध्ये तिसरी ट्रॉफी जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. ऑक्शनपूर्वी फ्रँचायझीने हरमनप्रीत कौर, नेट सायव्हर-ब्रंट, हेले मॅथ्यूज, अमनजोत कौर आणि जी कमलिनी यांना रिटेन केले होते. याशिवाय, अलीकडील T20 वर्ल्ड कपची प्लेयर ऑफ द टूर्नामेंट अमेलिया केर, तसेच एस सजना, सायका इशाक, संस्कृती गुप्ता आणि अनुभवी वेगवान गोलंदाज शबनिम इस्माइल यांनाही पुन्हा संघात सामील करण्यात आलं आहे.

हे ही वाचा –

Gautam Gambhir : गौतम गंभीरकडून कसोटी प्रशिक्षकपद काढलं जाणार असल्याच्या चर्चा, अखेर बीसीसीआयनं मौन सोडलंं

आणखी वाचा

Comments are closed.