अखेर ठरलं! पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार; माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब, कोण
Pune Municipal Corporation Election 2026 : राज्यात महानगरपालिकांचं बिगुल वाजल्यापासून पुण्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला होता. काही दिवसांपासून सुरु असलेल्या गुप्त बैठका आणि गाठीभेटींनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी पिंपरी-चिंचवड पाठोपाठ पुण्यातही एकत्रच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आधी जागावाटपामुळे आणि काही कारणामुळे प्रस्तावीत युती फिस्कटल्याची माहिती समोर आली होती, त्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरती शिक्कामोर्तब झाले आहे, पुणे महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. 40 जागांवर शरद पवारांची राष्ट्रवादी तुतारी लढणार असून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अंकुश काकडे, विशाल तांबे व इतर पदाधिकारी जागावाटप संदर्भात निर्णय घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
यासंदर्भात एबीपी माझाने काल बातमी दिली होती, त्या बातमीवर शिक्कामोर्तब झालं आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचं ठरलं असून राष्ट्रवादी १२५ आणि शरद पवार ४० जागा दिल्या आहेत. सकाळीच अजित पवार यांच्या बंगल्यावर एबी फॉर्मच वाटप सुरु झालं आहे. दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येण्यासाठी केलेल्या बैठकींना यश आल्याच पाहायला मिळत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडची महानगरपालिका निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत. पुणे महानगरपालिकेत अजित पवार गट 125 तर शरद पवार गट 40 जागांवर लढेल, असे सांगितले जात आहे.
NCP Pune: पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढवण्यावर शिक्कामोर्तब
पिंपरी-चिंचवडमधील सर्व प्रश्न एकत्रितपणे सोडवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी तळवडे येथे केली. याच ठिकाणाहून त्यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडत आगामी निवडणुकीत शहरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले. पिंपरी-चिंचवडनंतर आता पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काल रात्री उशिरापर्यंत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर यावर एकमत झाले असून आज दुपारी याबाबत अधिकृत पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली जाणार आहे.
NCP Pune: अजितदादांना 125, शरद पवार गट 40 जागा लढवणार
मिळालेल्या माहितीनुसार, येणाऱ्या महापालिका निवडणुकीत अजित पवार गट सुमारे 125 जागा, तर शरद पवार गट 40 जागा लढवणार असल्याचा प्राथमिक फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. दोन्ही गटांनी एकत्र येऊन पुण्यातील स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी संयुक्तपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आधीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची घोषणा झाल्यानंतर पुण्यातही तसाच निर्णय झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आज दुपारी होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्यात जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला, नेतृत्वाची भूमिका आणि आगामी रणनीती याबाबत सविस्तर माहिती दिली जाण्याची अपेक्षा आहे. पुण्याच्या राजकारणात ही युती कितपत प्रभावी ठरणार, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.